ICC Cricket World Cup 2019 मध्ये पहिल्या आठवड्यातील सर्व सामने सुरारीत पार पडले मात्र दुसऱ्या आवठवड्यात पावसामुळे तब्बल चार सामने रद्द करावे लागले. दरम्यान विश्वकपमध्ये मिळणाऱ्या सुविधांबाबत पाकिस्तानी (Pakistan) संघाने नाराजी व्यक्त केली आहे. आणि आता या संघाच्या पाठोपाठ, श्री लंकन (Sri Lanka) संघाने सुद्धा ICC कडे आपली तक्रार नोंदवली आहे. इंग्लंडमध्ये एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत संघाचे व्यवस्थापक अशांता डी मेल (Ashantha de Mel) यांनी ICC वर आरोप केला आहे की ज्या खेळपट्टीवर सामने होत आहेत त्यावर कमी सुविधा दिल्या उपलब्ध आहेत. (IND vs PAK, ICC World Cup 2019: मॅन्चेस्टर Pitch शी सरफराज अहमद नाखुश, भारताला अनुकूल खेळपट्टी बनवल्याचा आरोप)
डी मेल म्हणाले की, आम्ही आतापर्यंत कार्डिफ (Cardiff) आणि ब्रिस्टल (Bristol) वर चार सामने खेळले. ते सर्व सामने हिरवळ असलेल्या खेळपट्टीवर होते. दरम्यान इतर संघ मात्र पाटा खेळपट्टीवर खेळत होते. ज्या ठिकाणी जास्त धावा केल्या जातील अशी खेळपट्टी इतर संघांसाठी होती.
श्री लंकेने आत्तापर्यंत चार सामने खेळले असून एका सामन्यात त्यांनि विजय मिळवला आहे तर एक सामना गमावून दोन सामने पावसामुळे रद्द करण्यात आले होते. श्री लंकेचा पुढचा सामना ऑस्ट्रेलिया (Australia) शी ओव्हल (The Oval) मैदानात खेळाला जाईल.
'ज्यावर खेळपट्टीवर खेळून संघाने विजय मिळवला ती हिरवळ होती. संघाचा पुढचा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध असेल तिथंसुद्धा अशीच खेळपट्टी असेल. याआधी या मैदानावर झालेल्या सामन्यात धावांची बरसात झाली होती. हिरवळ असलेली खेळपट्टी ऑस्ट्रेलियाला फायद्याची ठरेल', डी मेल म्हणाले.
शिवाय डी मेल यांनी कार्डिफमध्ये सरावासाठी दिलेल्या सोयीसुविधांबद्दल हि नाराजी व्यक्त केली आहे. आम्हाला सरावासाठी तीनऐवजी फक्त दोनच नेट देण्यात आले होते. तर ब्रिस्टलमध्ये आम्ही ज्या हॉटेल मध्ये थांबलो तिथं स्विमिंग पूल नाही जो प्रत्येक संघासाठी खूप महत्त्वाचा असतो. चार दिवस आधी आम्ही याबाबत सांगितलं होतं पण त्यावर कोणतंही उत्तर आलं नसल्याचं डी मेल म्हणाले.