बबिता फोगट (फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर हॅलो फ्रेंन्डस् चाय पी लो असा व्हिडिओ सोमवती महावर नावाच्या महिलेने पोस्ट केला होता. त्यानंतर या व्हिडिओचे अनुकरण करत अनेक नेटकऱ्य़ांनीसुद्धा तसाच व्हिडिओ तयार केला होता. मात्र आता नावाजलेली कुस्तीपटू बबिता फोगट हिने पुन्हा एक व्हिडिओ आपल्या ट्विटर पोस्ट केला आहे.

बबिता फोगट हिने आज ट्विटरवर 6 सेकंदांचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात ती म्हशीचे दूध काढत आहे. तसेच तिने चाहत्यांना म्हशीचे दूध प्या असं सुद्धा ट्विटद्वारे सांगितले आहे. तर सोशल मीडियावर बबिताच्या तिच्या कुस्तीच्या कामगिरीबद्दल नेटकऱ्यांमध्ये प्रसिद्ध झाली आहे.

मात्र बबिताने आता पोस्ट केलेला व्हिडिओतून दूध काढण्याचा कामाला हलक मानत नाही असा संदेश दिला आहे.