सोमवारी (29 एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात सामना झाला होता. ईडन गार्डन्सवर झालेल्या या सामन्यात कोलकाताने 7 विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात वेगवान गोलंदाज हर्षित राणावर बीसीसीआयने बंदीची कारवाई केली आहे. आयपीएलच्या आचार संहितेतील नियमाचा भंग केल्याप्रकारणी त्याच्यावर एक सामन्याची बंदी आणि सामना शुल्काच्या (Match Fee) 100 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. दिल्लीविरोधातील सामन्यात विकेट घेतल्यानंतर हर्षित राणानं केलेले सेलिब्रेशन अंगलट आले आहे. हर्षित राणा याच्यावर आयपीएलनं दंडात्मक कारवाई केली आहे. ( LSG VS MI, IPL 2024 Toss Update: लखनऊने जिंकली नाणेफेक, मुंबईला दिले फलंदाजीसाठी आमंत्रण)
कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये आमना सामना झाला. कोलकात्यानं घरच्या मैदानावर एकतर्फी विजय मिळवला. पण कोलकात्याचा युवा गोलंदाज हर्षित राणा यावर कारवाई करण्यात आली. दिल्लीविरोधात विकेट घेतल्यानंतर हर्षित राणानं अभिषेक पोरेल याला तंबूत धाडलं. त्यानंतर त्यानं फ्लाईंग किस देत जोरदार सेलिब्रेशन केले. याचा फटका त्याला बसलाय.
दिल्लीचा फलंदाज अभिषेक पोरेलला त्रिफळाचीत केल्यानंतर राणाने डगआऊटच्या दिशेने इशारा करत सेंड-ऑफ दिला होता. त्यामुळे त्याच्यावर ही कारवाई झाल्याची शक्यता आहे. याच कलमाअंतर्गत त्याच्यावर यापूर्वीही कारवाई झाली आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यातही त्याने मंयक अगरवालला फ्लाईंग किस देत सेंड-ऑफ दिला होता. त्यावेळीही त्याच्यावर बीसीसीआयने दंडात्मक कारवाई केली होती. आता अशीच चूक त्याच्याकडून दुसऱ्यांदा झाली आहे.