IND vs WI T20I Series: भारतविरुद्ध वेस्ट इंडिज T20I मालिकेत व्यंकटेश अय्यरची दमदार कामगिरीमुळे हार्दिक पांड्यांचे भवितव्य धोक्यात ? सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत मजेदार मीम्स, पहा फोटो
Venkatesh Iyer and Hardik Pandya (Pic Credit - Instagram)

T20I मालिकेत भारताने वेस्ट इंडिजचा 3-0 ने पराभव केला. या मालिकेत टीम इंडियाला नवा फिनिशर (Finisher) मिळाला आहे. व्यंकटेश अय्यरने (Venkatesh Iyer) तीन सामन्यांत 92 धावा केल्या. त्याने मालिकेतील शेवटच्या सामन्यात झंझावाती कामगिरी करत नाबाद 35 धावा केल्या. व्यंकटेशच्या कामगिरीनंतर हार्दिक पांड्याबद्दल (Hardik Pandya) सोशल मीडियावर मीम्स व्हायरल (Memes viral) होऊ लागले. कोलकाता येथे खेळल्या गेलेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारताने 17 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात व्यंकटेशने 19 चेंडूत नाबाद 35 धावा केल्या. त्याच्या खेळीत 4 चौकार आणि 2 षटकारांचाही समावेश होता.

व्यंकटेशच्या या खेळीनंतर हार्दिक पांड्याबद्दल अनेक प्रकारचे मीम्स व्हायरल होत आहेत.माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनंतर टीम इंडियाकडे एकही चांगला फिनिशर नाही. हार्दिक पांड्याने अनेक सामन्यांमध्ये फिनिशरची भूमिका बजावली होती, पण आता व्यंकटेश फिनिशरच्या भूमिकेत आपली जागा निश्चित करू शकतो. हेही वाचा  IND vs WI T20I Series: वेस्ट इंडिजविरुद्ध मालिका जिंकली पण आपला प्रमुख खेळाडू दुखापतीने गमावला, श्रीलंका विरोधात खेळण्यावरही शंकास्पद

त्याची अलीकडची कामगिरी पाहता आगामी सामन्यांमध्ये टीम इंडिया त्याला स्थान देईल असे दिसते. अशा स्थितीत ते चांगली कामगिरी करून टीम इंडियामध्ये आपले स्थान निर्माण करू शकतात.

हार्दिक पांड्याबद्दलचे व्हायरल मीम्स