वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) ईडन गार्डन्स येथील तिसरा टी-20 सामना सुरु असताना वेगवान गोलंदाज दीपक चाहरला (Deepak Chahar) गोलंदाजी करताना दुखापत झाल्याने भारतीय क्रिकेट संघाला (Indian Cricket Team) मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाचा आघाडीचा वेगवान गोलंदाज चाहर, त्याच्या कोट्यातील दुसरे षटक टाकत असताना शेवटच्या चेंडूपूर्वी, त्याला पायात त्रास जाणवला. यानंतर तो मैदानावर बसला आणि वैद्यकीय उपचार मिळाल्यावर मैदानातून बाहेर पडावे लागले. भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चाहरला तिसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात उजव्या पायाला हॅमस्ट्रिंग (Hamstring) दुखापत झाली. यामुळे आता गुरुवारपासून सुरू होणाऱ्या श्रीलंका मालिकेसाठी (Sri Lanka Series) त्याचा खेळ संशयास्पद बनला आहे. विंडीजविरुद्ध अंतिम सामन्यात चाहर आपल्या जुन्या लयीत दिसला आणि दोन लवकर विकेट घेत त्याने पाहुण्या संघावर हल्ला चढवला. (IND vs WI 3rd T20I: टी-20 मध्येही टीम इंडिया अपराजित; वेस्ट इंडिज संघाचा रोहित ब्रिगेडने केला ‘डबल क्लीन स्वीप’, शार्दूल ठाकूरने पालटला सामना)
दीपक चाहरला फिजिओच्या मदतीने मैदानाबाहेर नेण्यात आले. लाइव्ह छायाचित्रे पाहता दीपक चाहरला दुखापत झाली असावी असा अंदाज लावला जाऊ शकतो. मात्र, बीसीसीआयकडून याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. तसेच दीपक काही वेळाने मैदानात परतला पण त्याने गोलंदाजी केली नाही. तर त्याच्या षटकातील शेवटचा चेंडू वेंकटेश अय्यरने टाकला, ज्यावर विंडीज फलंदाजाने षटकार ठोकला. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर तिसऱ्या आणि शेवटच्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात वेस्ट इंडिजच्या धावांचा पाठलाग सुरू असताना ही घटना घडली. चाहर नेहमीप्रमाणे बॉल स्विंग करत होता आणि त्याने दोन विकेट्स घेतल्या होत्या. लक्षात घ्यायचे की बीसीसीआयचे वैद्यकीय पथक सध्या त्याच्यावर लक्ष ठेवून आहे.
दरम्यान दीपक चाहरची दुखापत किती गंभीर आहे हे अद्याप समजून शकले नाही. तथापि जर स्थिती गंभीर असल्यास चाहरचे आयपीएलच्या सुरुवातीमध्ये खेळण्याचे देखील संशयास्पद असू शकते. दीपक याला पुन्हा खरेदी करण्यासाठी त्याची जुनी फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल लिलावात 14 कोटी रुपये मोजले. सामान्यतः, ग्रेड एक दुखापत पूर्ण बरी होण्यासाठी आणि पुनर्वसनासाठी सहा आठवडे लागतात. त्यामुळे आत्तापर्यंत, लखनऊ येथे 24 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिके त्याचे खेळणे नक्कीच संशयास्पद आहे. पुनर्वसन कार्यक्रम पार पाडण्यासाठी त्याला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये थेट बेंगळुरूला देखील जावे लागेल.