Happy Doctor's Day 2020: 'त्यांच्या प्रयत्नांचा अर्थ शब्दात वर्णन करू शकत नाही!' राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त रोहित शर्मा, व्हीव्हीस लक्ष्मण यांनी डॉक्टरांना केले सॅल्यूट
राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त रोहित शर्माने डॉक्टरांना केले सॅल्यूट (Photo Credit: Facebook/Pixabay)

कोरोना व्हायरसविरूद्ध (Coronavirus) जगातील लढाईसाठी जगभरातील डॉक्टरांच्या प्रयत्नांचे कौतुक करण्यासाठी कितीही कौतुक पुरेसे पडणार नाही. जागतिक संकटाच्या परिणामी, भारतात तसेच जगाच्या वेगवेगळ्या रुग्णालये कोरोना रूग्णांनी भरली आहेत. त्यांच्या सेवांचे कौतुक करत भारताचा मर्यादित षटकांचा उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma), माजी फलंदाज व्हीव्हीस लक्ष्मण (VVS Laxman) यांनी राष्ट्रीय डॉक्टर दिन (National Doctor's Day) 2020 च्या निमित्ताने सोशल मीडियावर खास मेसेज पोस्ट शेअर करत डॉक्टरांच्या प्रयत्नांचे स्वागत केले. कोरोना व्हायरसविरुद्ध लढाईत आवश्यक असलेल्या मार्गदर्शक सूचनांविषयी सोशल मीडियावर नियमितपणे आपलं मत मांडणार्‍या रोहितने चाहत्यांना या महामारीच्या काळात डॉक्टरांनी दाखवलेल्या धैर्याची आठवण करून दिली. “आपल्या सर्वांनी या कठीण काळात आमच्या डॉक्टरांनी केलेले त्याग आणि धैर्य माहित आहे. त्यांचे प्रयत्न आमच्यासाठी काय आहे हे शब्द वर्णन करू शकत नाहीत. मी त्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो. सर्व नागरिकांना त्यांच्या प्रोटोकॉलचे पालन करावे आणि त्यांचे कार्य सुलभ करावे #नॅशनलडॉक्टर्सडे,” रोहितने ट्विटवर पोस्ट शेअर करत लिहिले. (National Doctor's Day 2020: राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी खास पत्रक प्रसिद्ध करुन कोविड योद्धांना केला सलाम!)

दुसरीकडे, डॉक्टर रूग्णांवर उपचार करत असताना खूप संयम दर्शवतात असे म्हणत लक्ष्मण म्हणाले की वैद्यकीय व्यवसाय हा सर्वांत श्रेष्ठ आहे याची जाणीव डॉक्टरांच्या कुटूंबातील असल्याने त्यांना माहिती आहे. “डॉक्टरांच्या कुटूंबातून असल्याने मला नेहमीच माहित होतं की वैद्यकीय व्यवसाय, सर्वांत श्रेष्ठ आहे, ते ज्ञान आणि कौशल्य कसे वापरतात हे मी जवळून पाहिले आहे,’’ लक्ष्मणने सोशल मीडियाला दिलेल्या व्हिडिओ मेसेजमध्ये म्हटले. लक्ष्मणचे पालक, डॉ शांताराम आणि डॉ सत्यभामा, डॉक्टर आहेत.

रोहित शर्मा 

व्हीव्हीस लक्ष्मण

मुंबई इंडियन्स

हार्दिक पांड्याने दुखापतीतून सावर्तनाचा एक व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले,"व्यावसायिक अ‍ॅथलीट म्हणून आलेल्या दुखापतीतून मुक्त होण्यासाठी मला वैयक्तिकरित्या मदत करणार्‍या सर्व डॉक्टरांचे आभार. आम्हाला टॉप स्थितीत ठेवण्यात मदत करणार्‍या प्रत्येकाचे खूप ऋणी आहे."

दरम्यान, कोरोना व्हायरसच्या एकूण प्रकरणांची नोंद 5.5 लाखांवर गेली असल्याने भारत चिंताजनक अवस्थेत आहे. यापैकी 66% प्रकरणे केवळ जूनमध्ये नोंदविण्यात आली आहेत. 1 जूनपासून अनलॉकची लागू करण्यात आल्यापासून आतापर्यंत भारतात 3,76,305 प्रकरणे नोंदली गेली आहेत. महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली आणि गुजरातसारख्या राज्यांमध्ये आतापर्यंतच्या एकूण प्रकरणांपैकी जवळजवळ दोन तृतीयांश प्रकरणे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशाला दिलेल्या भाषणात इतर अनेक देशांच्या तुलनेत भारत अजूनही उत्तम स्थितीत आहे या वस्तुस्थितीचा पुनरुच्चार करताना त्यांनी शिथिलता दिल्यापासून नागरिकांच्या वैयक्तिक आणि सामाजिक वर्तनातील वाढते "दुर्लक्ष" यावरही त्यांनी टीका केली.