National Doctor's Day 2020: राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी खास पत्रक प्रसिद्ध करुन कोविड योद्धांना केला सलाम!
Rajesh Tope (Photo Credits: Twitter)

आज संपूर्ण देशभर राष्ट्रीय डॉक्टर दिन (National Doctor's Day) साजरा केला जात आहे. रुग्णसेवेचे अखंड व्रत हाती घेऊन दिवसरात्र एक करून त्यांना ठणठणीत बरे करणे हा एकच ध्यास ज्यांना लागला असतो अशा डॉक्टरांना या दिनाच्या विशेष शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी हा दिवस खास आहे. म्हणून या दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी खास शुभेच्छा देण्यासाठी एक पत्रक सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध केले आहे. यात त्यानंनी सर्व डॉक्टरांना राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या शुभेच्छा देऊन गेले 3 महिने आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णांसाठी झटणा-या कोविड योद्धांना सलाम केला.

राजेश टोपे यांनी 'देव कुठे आहे तर तुमच्यात आहे, तसा तुमच्यासाठी कुठला खास दिवस असण्याची गरज नाही कारण देव आपल्याला नेहमीच हवा असतो. सध्या सर्व धार्मिक स्थळे बंद असल्यामुळे हे देव आज आम्हाला तुमच्यात दिसत आहे' असे या पत्रात म्हटले आहे. Coronavirus Update in Maharashtra: महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, पुण्यासह अन्य जिल्ह्यात किती आहेत COVID-19 चे रुग्ण? पाहा आजचे ताजे अपडेट्स

गेले 3 महिने कोविड रुग्णांना बरे करण्यासाठी दिवसरात्र एक करणा-या या कोविड योद्धांना आतापर्यंत 90 हजारांहून अधिक रुग्णांना बरे केले आहे. या कठीण परिस्थिती या कोविड योद्धांनी रुग्णांना न केवळ शारीरिक शक्ती दिली नाही तर त्यांचे मनोबल वाढविण्यासाठीही अतिशय परिश्रम घेतले. त्यांच्या या जिद्दीला, अथक परिश्रमाला सलाम असेही राजेश टोपे म्हणाले आहेत.

Doctor's Day 2020: राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या शुभेच्छा खास WhatsApp Stickers, Messages, Greetings - Watch Video 

राज्यात काल (30 जून) दिवसभरात 4,878 कोविड रुग्ण आढळले असून राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 1,74,761 अशी झाली आहे. तसेच मृत्यूदरापेक्षा रिकव्हरी रेट जास्त असल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले आहे.