Coronavirus Update in Maharashtra: महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, पुण्यासह अन्य जिल्ह्यात किती आहेत COVID-19 चे रुग्ण? पाहा आजचे ताजे अपडेट्स
Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस (Coronavirus) रुग्णांच्या संख्येने दीड लाखांचा टप्पा पार केला आहे. तर देशात हाच आकडा साडे पाच लाखांच्या पार गेला आहे. यात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र (Maharashtra) राज्यातच आहेत. राज्यात काल (30 जून) दिवसभरात 4,878 कोविड रुग्ण आढळले असून राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 1,74,761 अशी झाली आहे. काल नवीन 1951 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 90,911 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 75,979 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी याबाबत माहिती दिली. आज राज्यात 254 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच मृत्यूदरापेक्षा रिकव्हरी रेट जास्त असल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत असून त्यापाठोपाठ ठाणे, पुणे, पालघरमध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. कोरोनाबाधितांची संख्या 77 हजार 197 वर पोहचली आहे. यापैकी 4 हजार 554 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 44 हजार 170 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

पाहूयात महाराष्ट्रातील जिल्हानिहाय COVID-19 रुग्णांची आकडेवारी: (30 जून रात्री 9:00 पर्यंत)

जिल्हा संक्रमित रुग्ण मृत्यू बरे झालेले रुग्ण

मुंबई

77658

4556

44170

ठाणे

37630

956

15042

पुणे

22327

752

11270

पालघर

5858

108

2621

औरंगाबाद

5328

256

2349

नाशिक

4226

222

2232

रायगड

4254

102

2127

जळगाव

3415

234

1916

नागपुर

1468

15

1144

अकोला

1536

76

973

सातारा

1076

43

724

सोलापुर

2651

265

1473

कोल्हापुर

846

11

711

रत्नागिरी

595

27

435

धुळे

1094

54

544

अमरावती

566

28
414

जालना

552 14 334

सांगली

376 11 217

नांदेड

344 13 231

अहमदनगर

431 14 273

हिंगोली

270 1 241

यवतमाळ

285 10 203

लातुर

331 18 191

उस्मानाबाद

215 10 169

सिंधुदुर्ग

219 4 154

बुलडाणा

245 12 145

गोंदिया

123 1 102

बीड

118 3 91

परभणी

85 4 74

नंदुरबार

175 7 72

भंडारा

77 0 49

वाशिम

102 3 71

गडचिरोली

66 1 58

चंद्रपुर

94 0 55

वर्धा

19 1 12

अन्य जिल्हे

89 23 0

एकुण
 

174761

7855

90911

आतापर्यंतच्या 9,66,723 नमुन्यांपैकी, 1,74,761 इतक्या नमुन्यांची (18.07 टक्के) कोरोना चाचणी सकारात्मक आली आहे. सध्या राज्यात 5,78, 033 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत, 38,866 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.