Photo Credit- X

Superbet Classic Chess: भारतीय ग्रँडमास्टर डी गुकेश(D Gukesh)ने आपला शानदार फॉर्म सुरू ठेवला आहे. त्याने सुपरबेट क्लासिक बुद्धिबळ स्पर्धेत(Classic Chess Tournament) पहिल्या फेरीत जिंकून विजयी सुरुवात केली आहे. गुकेशने रोमानियाच्या डिसे बोगदान-डॅनियलचा पराभव केला. गुकेश याची लढत वर्षाच्या अखेरीस विश्वविजेता चीनचा डिंग लिरेन याच्यासोबत असणार आहे. त्याला आव्हान देण्याच्या तयारीत असलेल्या गुकेशला या सामन्यादरम्यान नशीबाची साथ लाभली. खेळा दरम्यान केलेल्या चुकांचा फायदा उठवण्यात रोमानियाचा खेळाडू अपयशी ठरला. यानंतर गुकेशने शानदार पुनरागमन करत विजय मिळवला.

बोगदान-डॅनियल याने बचाव चालीने सुरुवात केली ज्यामुळे सामना मधल्या काळात गुंतागुंतीचा झाला. ज्यात दोघांनीही खेळताना अनेक चुकीच्या चाली चालल्या रोमानियन खेळाडूला गुकेशवर आघाडी घेण्याची संधी होती, परंतु त्याने तो चान्स गमावला. यानंतर दमदार पुनरागमन करण्यात गुकेशला यश आले. त्यानंतर त्याने प्रतिस्पर्धी खेळाडूला कोणतीही संधी न देता विजयाची नोंद केली. उमेदवारी स्पर्धा जिंकल्यानंतर गुकेश प्रथमच शास्त्रीय बुद्धिबळ स्पर्धेत सहभागी होत आहे.

या स्पर्धेत आणखी एक भारतीय स्पर्धक, आर प्रज्ञानंद आणि उझबेकिस्तानच्या नोदिरबेक अब्दुसत्तोरोव यांच्यातही अटिथठीचा सामना झाला. मात्र, त्यात प्रज्ञानंदला बरोबरीत समाधान मानावे लागले. प्रज्ञानंदला अब्दुसाटोरोव्हच्या कडव्या आव्हानाचा सामना करावा लागला. दोन्ही खेळाडूंनी 60 चालीनंतर बरोबरी साधली. सुरुवातीच्या फेरीत विजय मिळविणाऱ्या खेळाडूंमध्ये अमेरिकेच्या फॅबियानो कारुआनाचाही समावेश होता. त्याने फ्रान्सच्या फिरोझा अलिरेझाचा पराभव केला.