FIH Men’s Series Finals: जपानला 7-2 नमवून भारतीय संघाचा अंतिम फेरीत प्रवेश, आता दक्षिण आफ्रिकेशी लढत
(Image Credit: PTI Image)

भारता (India) ने हॉकी संघाने शुक्रवारी कलिंगा स्टेडियम (Kalinga Stadium) वर एफआयएच पुरुष सीरीझ (FIH Men’s Series) फाइनलच्या उपांत्य सामन्यात जपान (Japan) ला 7-2 ने पराभूत करून अंतिम फेरीत धडक मारली आहे. जपानच्या संघाने सुरुवाती पासूनच भारतावर दबाव बनवण्याचा प्रयत्न केला जेव्हा केंट तनाका (Kenta Tanaka) ने पहिल्या 90 सेकंदात पहिला गोल केला. भारताने ही पालटवार करत जपान संघाला तणावात टाकले.

गुरसाहिबजित सिंगने गमावलेल्या संधीमुळे आणि युसुके टाकानोच्या मोठ्या बचावानंतर होम टीमने हर्मनप्रीत सिंघ (Gursahibjit Singh) च्या पेनल्टी कॉर्नरच्या जोरावर स्कोअरची बरोबरी केली. मात्र जपानचा संघ भारताला स्पर्धा देण्याच्या उद्धेशानेच आला होता. प्रथम, केंटा तनाका, याने भारतीय संरक्षणास दबावात ठेवले. मग, खेळाच्या 20 व्या मिनिटाला कोटा वाट्णाबे (Kota Watanabe) ने 2 गोल करत 2-2 अशी बरोबरी साधली.

दुसऱ्या सहामाहीत,भारताने बरेच पेनल्टी कॉर्नर जिंकले आणि मात्र रामनदीप सिंघ (Ramandeep Singh) हा सामन्याचा नायक ठरला. रामनदीपच्या पाठोपाठ त्याचा सहकारी गुरसाहिबिजीत सिंग (Gursahibjit Singh) यांनी तिसऱ्या तिमाहीच्या शेवटी गोल करत भारताला 6-2 अशी बाधत मिळवून दिली. शेवटचा अर्धा वेळ राहिला असता, जपानला अनेक पेनल्टी कॉर्नर मिळाले मात्र ते त्याचा लाभ घेऊ शकले नाही ज्यामुळे ते सामना गमावून बसले.

अंतिम फेरीत भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी (South Africa) होणार. आफ्रिका संघाने उपांत्यफेरीत यूएई (UAE) संघाचा 2-1 ने पराभव केला. दक्षिण आफ्रिका आणि भारतातली ही अंतिम फेरीतली लढत 15 जूनला होईल, त्याच बरोबर जपान आणि यूएई संघ तिसऱ्या क्रमांकासाठी लढतीसाठी आमने-सामने येतील.