बजरंग पुनिया (Photo Credit: PTI)

जागतिक अजिंक्यपद कांस्यपदक जिंकणारा भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियाने (Bajrang Punia) सहा महिन्यांचा पगार कोरोना व्हायरसविरुद्ध (Coronavirus) लढा देण्यासाठी दान करण्याची घोषणा केली. शिवाय, बजरंगने टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympics) पुढे ढकलण्याची मागणी केली. तो म्हणाले की, मुख्य देशांनी आधीच माघार घेतली असल्याने जर हे खेळ आयोजित केले तर त्याची चमक कमी होईल. 25 वर्षीय बजरंग भारतासाठी खेळातील पदकांच्या दावेदारांपैकी एक आहे, पण सध्या जगभरात कोरोना व्हायरसच्या प्रसारामुळे यंदा या खेळांचे आयोजन होण्यावर संभ्रम आहे. चीनमधून उद्रेक झालेल्या या व्हायरसची जगभरात 3,00,000 लोकांना लागण झाली असून 15000 हुन अधिक जणांनी आपले प्राण गमावले आहेत. 2019 वर्ल्ड चॅम्पियनशिपचे कांस्यपदक मिळविणारा बजरंग स्पेशल ड्युटीवर (OSD) ऑफिसर म्हणून रेल्वेमध्ये काम करतो. (COVID-19 पासून बचाव करण्यासाठी इरफान आणि युसूफ पठाण यांनी घेतला पुढाकार, 4,000 मास्क केले दान Watch Video)

पुनियाने ट्विटरवर लिहिले की, “हरियाणा कॅरोना रिलीफ फंडाच्या समर्थनासाठी मी माझा सहा महिन्यांचा पगार अर्पण करतो." केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजिजू यांनी पुनियाच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. कोविड-19 विरुद्ध लढा देण्यासाठी हरियाणा सरकारने सोमवारी कोविड...संघर्ष सेनानी-हा उपक्रम सुरू केला आहे. पीटीआयशी बोलताना बजरंग म्हणाले, ऑलिम्पिकपूर्वी आम्हाला कोरोनाव्हायरसशी झुंज द्यावी लागेल.जर परिस्थिती सुधारली नाही आणि 2-3 महिने कायम राहिली तर ऑलिम्पिक पुढे ढकलणे योग्य ठरेल."

बजरंग सोनीपत येथील अपार्टमेंटमध्ये प्रशिक्षण घेत आहे तर त्याचा प्रशिक्षक शाको बेंटिनीनिस जॉर्जियाला रवाना झाला आहे. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने (आयओए) म्हटले आहे की सुमारे चार आठवड्यांच्या कालावधीत टोकियोमध्ये आयोजित होणाऱ्या खेळांवर सहभाग घेण्याबाबत निर्णय घेतला जाईल. खेळ पुढे ढकलण्यासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीवर (आयओसी) प्रचंड दबाव आहे. दरम्यान, भारतीय पदक स्पर्धक विनेश फोगाट म्हणते की ती कडक प्रशिक्षण घेत आहे आणि खेळ पुढे ढकलल्याबद्दल तिला काय वाटते हे महत्वाचं नाही.