क्रीडा कारकिर्द पूर्ण करण्यासाठी प्रियकराला नकार दिल्याने, जलतरणपटूची हत्या
साफिया अस्कोरोव्हा (फोटो सौजन्य- ट्विटर)

आयुष्यात जलतरणपटूचे स्वप्न उराशी बाळगून त्यासाठी अथांग प्रयत्न करणाऱ्या जलतरणपटू हिने प्रियकराला प्रेमसंबंधासाठी नकार दिल्याने तिची निघृण हत्या केल्याची धक्कादायक घडना घडली आहे. या जलतरणपटूने तिचे संपूर्ण लक्ष क्रीडाक्षेत्रात प्रस्थापित करण्याचे ठरविले होते. मात्र प्रियकराला दिलेला नकार तिच्या जीवावर बेतला आहे.

रशियामध्ये राहणारी साफिया अस्कोरोव्हा (16वर्षे) असे या जलतरणपटूचे नाव आहे. साफियाने ऑलिम्पिकमध्ये पद मिळविण्यासाठी तिने प्रेमसंबंधापासून दूर राहण्याचा निर्धार केला होता. तर साफियाने तिचा हा निर्णय प्रियकरालासुद्धा सांगितला. मात्र प्रियकराला तिने घेतलेला निर्णय पटला नसल्याचे त्याने तिची हत्या केली आहे. तर साफियाच्या मानेवर, छातीत आणि पोटावर असे 30 पेक्षा जास्त वार तिच्यावर प्रियकराने केले आहेत.

साफियाचा प्रियकर हा सुद्धा जलतरणपटू आहे. परंतु त्याला साफिया एवढे यश प्राप्त करता आले नाही. तसेच प्रियकराला साफियाच्या यशाबद्दल जळफळाट व्हायची असे तिच्या मैत्रिणींनी सांगितले आहे. तर आरोपी प्रियकराला पोलिसांनी अटक केली असून त्याने केलेला गुन्ह्याची कबुली दिली आहे.