Dutee Chand ठरली इटली येथील शर्यतीत सुवर्ण पदक मिळवणारी पहिली भारतीय, नरेंद्र मोदी यांनी केले कौतुक
File Photo of Dutee Chand

भारताची आघाडीची महिला धावपटू द्युती चंद (Dutee Chand)  हिच्या शिरपेचात आणखीन एक सुवर्ण पदकाचा (Gold Medal) तुरा जोडला गेला आहे, इटली (Italy) मधील नेपल्स (Napels) शहरात सुरु असलेल्या 30 व्या समर युनिव्हर्सिटी ( 30th Summer University) स्पर्धेत तिने ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या स्पर्धेत द्युतीने 100 मीटर अंतर 11.32 सेकंदात पार करत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आहे, विशेष म्हणजे या स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलेली ती पहिला भारतीय खेळाडू आहे.

यापूर्वी या स्पर्धेत भारतीय धावपटूंना पात्रता फेरीपर्यंत पोहचणे ही शक्य झाले नव्हते. अशात द्यूतीने मिळवलेले हे यश नक्कीच कौतुकास्पद आहे, यानंतर सर्वच माध्यमांवरून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील एक ट्विट करून तिचे अभिनंदन केले आहे तसेच आम्हाला तुझा अभिमान वाटतो अशा शब्दात मोदींनी तिला प्रोत्साहन दिले आहे.

द्युती चंद ट्विट

हे ही वाचा- समलैंगिक संबंधात असलेल्या द्युती चंद हिने कुटुंबियांसोबत तोडले नाते, अधर्म करत असल्याची वडिलांनी केली टीका

नरेंद्र मोदी ट्विट

अलीकडेचं द्यूतीने आपण समलैंगिक संबंधात असल्याची कबुली दिली होती यामुळे तिच्या कुटुंबासहित अनेकांनी तिच्यावर टीका केली होती, मात्र याचा आपल्या करिअरवर अजिबात असा होऊ न देता ड्युटीने हे यश मिळवले आहे, याबाबत माहिती देताना तिने एक ट्विट करत त्यावर "तुम्ही मला आणखीन खाली खेचण्याचा प्रयत्न करा, मी अजून जोमाने पुन्हा वर येईन" असे कॅप्शन लिहिले आहे.