House of CSK fan.(Twitter|@CSK

इंडियन प्रिमियर लीगच्या इतिहासात चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) सर्वात लोकप्रिय फ्रॅंचायझी ठरली आहे. तसेच चेन्नईच्या संघाचे आणि कर्णधार महेंद्र सिंह धोनीचे (Mahendra Singh Dhoni) असंख्य चाहते आहेत. यावर्षी यूएईमध्ये सुरु असलेल्या आयपीएल 2020 मध्ये चेन्नईच्या संघाला चांगली कामगिरी बजावता आली नाही. मात्र, तरीदेखील चेन्नई आणि महेंद्र सिंह धोनीच्या चाहत्यांच्या संख्येवर कोणतीही परिणाम झाला नाही. यातच तामिळनाडूच्या कुडलोर जिल्ह्यातील राहणाऱ्या धोनीच्या एका चाहत्याने संपूर्ण घराला सीएसकेच्या पिवळ्या रंगात रंगवले आहे. यासाठी त्याने तब्बल दीड लाखाचा खर्च केला आहे.

गोपी कृष्णन असे त्या चाहत्याचे नाव आहे. गोपी कृष्णन हा तामिळनाडूच्या अरंगूर येथील रहिवाशी आहे. त्याने धोनी प्रती आणि चेन्नई संघाप्रती प्रेम व्यक्त करत त्याच्या संपूर्ण घराला पिवळ्या रंगात रंगवले आहे. घराच्या समोरच्या भिंतीवर त्याने धोनीच्या छायाचित्रांसह सीएसकेच्या लोगो रंगवून घेतला आहे. तसेच दाराच्या उजव्या बाजुला 'होम ऑफ धोनी फॅन' असे लिहले आहे. याबद्दल चेन्नई सुपर किंग्सने आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवर फोटो शेअर करुन ही माहिती दिली आहे. हे देखील वाचा- IPL 2020 Mid-Season Transfer: आयपीएलच्या तेराव्या हंगामात इमरान ताहिर याला संघात जागा नाही? चेन्नई सुपर किंग्जचे सीएओ काशी विश्वनाथन यांनी दिली 'अशी' माहिती

सीएसके ट्वीट-

आयपीएलच्या 3 किताबावर नाव कोरणार्या चेन्नई सुपर किंग्सच्या संघाला यंदाच्या हंगामात खास कामगिरी आली नाही. चेन्नईने या हंगामात आत्तापर्यंत 8 सामने खेळले आहेत. त्यापैकी केवळ 3 सामन्यात विजय मिळवता आला आहे. तर 5 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. सध्या चेन्नईचा संघ गुणतालिकेत सहावव्या क्रमांकावर आहे.