Fact Check: हिमा दासने कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये सुवर्णपदक जिंकले का? व्हायलर व्हिडिओचे सत्य घ्या जाणून
File image of Hima Das (Photo Credits: Twitter)

बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा 2022 (CWG 2022) मध्ये संकेत सरगरने भारताला पहिले पदक मिळवून दिले, त्याचप्रमाणे अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी दावा केला की हिमा दासनेही (Hima Das) सुवर्णपदक जिंकले. दुखापतीशी झुंज देत असलेल्या संकेतने वेटलिफ्टिंग स्पर्धेत रौप्य पदक जिंकून पदकाच्या तालिकेत भारताचे खाचे उघडले. दरम्यान, हिमा दासचा विजय साजरा करतानाचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमामात व्हायरल होत आहे. त्यामुळे हिमा दासने कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये सुवर्णपदक जिंकले का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुख्यता व्हायरल होणाऱ्या व्हिडिओचे सत्य आम्ही जाणून घेतले आहे. ट्विटरवर मोठ्या प्रमाणावर शेअर केलेला केलेला व्हिडिओ CWG 2022 चा नसून  2018 च्या ज्युनियर चॅम्पियनशिपमधील व्हिडिओ आहे असे समजून येते.

हिमा दास आंतरराष्ट्रीय ट्रॅक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय ठरली आणि तिने इतिहास रचला. हिमा दास अद्याप बर्मिंगहॅममधील CWG 2022 मध्ये सहभागी झालेली नाही आहे. हिमा दास यांचा सामना  03 ऑगस्ट 2022 रोजी होणार आहे. त्यामुळे शेअर केलेले व्हिडिओ जुने आहेत आणि हिमा दासने  CWG 2022 अद्याप कोणतेही पदक जिंकलेले नाही.

हा व्हिडिओ नवीन म्हणून शेअर केला जात आहे

व्हिडिओबद्दलचे सत्य 

भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागही या खोट्या बातम्यांना बळी पडला आणि त्याने आसामच्या खेळाडूचे अभिनंदन केले. भारताच्या माजी सलामीवीराने मात्र नंतर हे ट्विट डिलीट केले. पुन्हा एकदा या वस्तुस्थितीचा पुनरुच्चार करताना, हिमा दासने CWG 2022 मध्ये सुवर्णपदक जिंकले नाही कारण तिने अद्याप स्पर्धेत भाग घेतला नाही.