अलिबागमध्ये निसर्ग चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा व्हिडिओ (Photo Credit: Twitter/Getty)

संपूर्ण देश करोना व्हायरस संक्रमणाशी लढा देत असताना, मागील काही आठवड्यांमध्ये देशावर दोनवेळा चक्रीवादळाचं संकट येऊन गेलं. काही दिवसांपूर्वी अम्फान चक्रीवादळाने पश्चिम बंगाल आणि ओडीशामध्ये मोठी हानी केली. त्यानंतर आता देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर महाराष्ट्र आणि गुजरातला निसर्ग चक्रीवादळाचा (Nisarga Cyclone) फटका बसला आहे. मुंबई, ठाणे, पनवेलसह अन्य महाराष्ट्राच्या अन्य भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अलिबागला या वादळाचा सर्वात मोठा फटका बसला दिसत आहे. भारतीय पुरुष टीमचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री (Ravi Shastri), जे लॉकडाउन झाल्यापासून अलिबागमध्ये (Alibaug) राहत आहेत त्यांनी अलिबागमधील चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. शास्त्रींनी व्हिडिओ सामायिक केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, "मी असा अनुभव कधी घेतला नाही, 100 किमी वेगाने वारा वाहतो..उदंड." (Cyclone Nisarga: नवी मुंबई येथे वादळी वाऱ्यासोबत जोरदार पाऊस; सीबीडी बेलापूर विभागातल्या दुर्गामाता संभाजीनगरमधील स्थानिक नागरिकांचे शाळामध्ये स्थलांतर)

शास्त्रींनीं शेअर केलेला हा व्हिडिओ बर्‍यापैकी भिती निर्माण करणारा आहे. व्हिडिओमध्ये आपण काही लोक भीतीने किंचाळतानाही दिसत असल्याचे पाहू शकतात. भारतीय संघाच्या प्रशिक्षकाच्या या व्हिडिओवर लोकांनीही प्रतिक्रिया दिली. शास्त्री यांच्या भाषणाच्या शैलीत ते म्हणाले, 'ट्रेसर बुलेट'.

ट्रेसर बुलेटप्रमाणे उडत आहे!

‘निसर्ग’नं रायगड जिल्ह्याला जोरदार तडाखा दिला आहे. वादळामुळे रायगड जिल्ह्यातील काही भागात मोबाईल सेवा खंडित झाली आहे. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी ही माहिती दिली. लॅन्डफॉलची सुरूवात झाल्यानंतर अलिबागमध्ये मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. दरम्यान वार्‍याचा वेग देखील वढला आहे. 120 kmph वेगाने वारे वाहत आहेत. मुंबई कुलाबा भागात 72 KMPH इतका वार्‍याचा वेग दुपारी 12.30 च्या सुमारास नोंदवण्यात आला आहे. मुंबई महानगर पालिका या वादळासाठी सज्ज आहे. दरम्यान, मुंबई मध्ये निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कलम 144 लागू केले आहे. यामध्ये नागरिकांना बाहेर पडण्यावर बंदी घालण्यात आली आहे.