![](https://mrst1.latestly.com/uploads/images/2025/02/159-2.avif?width=380&height=214)
Zimbabwe National Cricket Team vs Ireland National Cricket Team, 1st ODI Match 2025 Scorecard: झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि आयर्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील (ODI Series) पहिला सामना आज म्हणजे 14 फेब्रुवारी रोजी खेळवण्यात आला. दोन्ही संघांमधील हा सामना हरारे (Harare) येथील हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये (Harare Sports Club) खेळवण्यात आला. दोन्ही मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वे संघाने आयर्लंडचा 49 धावांनी पराभव केला. यासह झिम्बाब्वेने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेत झिम्बाब्वेचे नेतृत्व क्रेग एर्विन (Craig Ervine) करत आहे. तर आयर्लंडचे नेतृत्व पॉल स्टर्लिंगकडे (Paul Stirling) आहे.
Brian Bennett stars with an impressive 169 runs, while bowler Blessing Muzarabani takes 4 wickets, as Zimbabwe defeat Ireland by 49 runs to take a 1-0 lead in the 3-match series.
Match Details 📝: https://t.co/Sfp3x6dTn0#ZIMvIRE #Travel&ExperienceZimbabwe pic.twitter.com/MzKgoKOOKb
— Zimbabwe Cricket (@ZimCricketv) February 14, 2025
पहिल्या एकदिवसीय सामन्यात, आयर्लंडचा कर्णधार पॉल स्टर्लिंगने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर, झिम्बाब्वे प्रथम फलंदाजी करण्यासाठी आला आणि त्यांची सुरुवात उत्कृष्ट झाली कारण दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी आक्रमक फलंदाजी केली आणि एकूण 95 धावा केल्या. केल्या. झिम्बाब्वेकडून सलामीवीर ब्रायन बेनेटने 169 धावांची शानदार खेळी केली. या उत्कृष्ट खेळीदरम्यान, ब्रायन बेनेटने 163 चेंडूत 20 चौकार आणि तीन षटकार मारले. ब्रायन बेनेट व्यतिरिक्त कर्णधार क्रेग एर्विनने 66 धावा केल्या.
दुसरीकडे, आयर्लंड संघाला पहिले मोठे यश मिळाले. आयर्लंडकडून मार्क अदायरने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. मार्क अडायर व्यतिरिक्त अँडी मॅकब्राइन आणि जोशुआ लिटल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. हा सामना जिंकण्यासाठी आयर्लंड संघाला 50 षटकांत 300 धावा कराव्या लागल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना आयर्लंड संघाची सुरुवात निराशाजनक झाली आणि अँड्र्यू बालबर्नी खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. संपूर्ण आयर्लंड संघ 46 षटकांत फक्त 250 धावांवर ऑलआउट झाला. आयर्लंडकडून कर्टिस कॅम्फरने सर्वाधिक 44 धावांची आक्रमक खेळी खेळली. कर्टिस कॅम्फर व्यतिरिक्त हॅरी टेक्टरने 39 धावा केल्या.
वेगवान गोलंदाज रिचर्ड नगारावा यांनी झिम्बाब्वे संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. झिम्बाब्वेकडून ब्लेसिंग मुझारबानीने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. ब्लेसिंग मुझाराबानी व्यतिरिक्त, रिचर्ड नगारावाने तीन विकेट्स घेतल्या. मालिकेतील दुसरा सामना रविवार, 16 फेब्रुवारी रोजी दुपारी 1:00 वाजता हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे येथे खेळला जाईल.
पहिल्या डावातील धावफलक:
झिम्बाब्वे फलंदाजी: 299/5, 50 षटकांत (ब्रायन बेनेट 169, बेन करन 28, क्रेग एर्विन 66, वेस्ली मधवेरे 8, सिकंदर रझा 8, जोनाथन कॅम्पबेल 6 नाबाद, तादिवानाशे मारुमानी 2 नाबाद)
आयर्लंड गोलंदाजी: (मार्क अडायर 3 बळी, अँडी मॅकब्राइन 1 बळी आणि जोशुआ लिटल 1 बळी).
दुसऱ्या डावातील धावफलक:
आयर्लंड फलंदाजी: 250/10, 46 षटकांत (पॉल स्टर्लिंग 32, अँड्र्यू बालबर्नी 0, हॅरी टेक्टर 39, लॉर्कन टकर 31, कर्टिस कॅम्फर 44, जॉर्ज डॉकरेल 34, अँडी मॅकब्राइन 32, मार्क अडायर 2, ग्राहम ह्यूम नाबाद 7, मॅथ्यू हम्फ्रेस 0, जोशुआ लिटल 1)
झिम्बाब्वे गोलंदाजी: (रिचर्ड नगारावा 3 बळी, ब्लेसिंग मुझाराबानी 4 बळी, वेस्ली माधेव्हेरे 2 बळी, सिकंदर रझा 1 बळी).