Photo Credit- X

Zimbabwe National Cricket Team vs Ireland National Cricket Team Only Test 2025 Day 5 Live Streaming: झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि आयर्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ (ZIM vs IRE) यांच्यातील एकमेव कसोटी सामन्याचा पाचवा दिवस आज म्हणजे 10 फेब्रुवारी रोजी खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळला जात आहे. चौथ्या दिवसाच्या खेळाअखेर झिम्बाब्वेने 68 षटकांत 7 गडी गमावून 183 धावा केल्या आहेत. यजमान संघाला विजयासाठी अजूनही 109 धावांची आवश्यकता आहे. झिम्बाब्वेकडून वेस्ली माधेवरे 61 धावांवर नाबाद आहेत आणि न्यूमन न्यामुरी 5 धावांवर नाबाद आहेत. याशिवाय, ताकुडझवानाशे कैतानो 14 धावा काढून बाद झाला, बेन करन 4 धावा काढून बाद झाला आणि निक वेल्च 5 धावा काढून बाद झाला.

दुसरीकडे, आयर्लंडकडून मॅथ्यू हम्फ्रीजने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर मार्क अडायरने 1 आणि बॅरी मॅकार्थीने 2 विकेट घेतल्या. पाचवा दिवस झिम्बाब्वेसाठी खूप महत्त्वाचा असेल. त्याच वेळी, आयर्लंड संघाला चांगली गोलंदाजी करावी लागेल.

झिम्बाब्वे आणि आयर्लंड यांच्यातील एकमेव कसोटी सामन्याचा पाचवा दिवस कधी खेळला जाईल?

झिम्बाब्वे आणि आयर्लंड यांच्यातील एकमेव कसोटी सामन्याचा पाचवा दिवस आज म्हणजेच सोमवारी 10 फेब्रुवारी रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लब येथे खेळला जाईल.

झिम्बाब्वे आणि आयर्लंड यांच्यातील एकमेव कसोटी सामन्याचा पाचवा दिवस कुठे पहाल?

झिम्बाब्वे आणि आयर्लंड यांच्यातील कसोटी मालिकेचे भारतातील टीव्हीवर थेट प्रक्षेपण होण्याची कोणतीही माहिती नाही. तर लाईव्ह स्ट्रीमिंग फॅनकोड अॅप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल.

दोन्ही संघांचे 11 खेळाडू

झिम्बाब्वे: बेन कुरन, ताकुडझवानाशे कैतानो, निक वेल्च, ब्रायन बेनेट, जोनाथन कॅम्पबेल (कर्णधार), वेस्ली माधेवेरे, न्याशा मायावो (यष्टीरक्षक), न्यूमन न्यामहुरी, रिचर्ड नगारावा, ब्लेसिंग मुझाराबानी, ट्रेव्हर ग्वांडू

आयर्लंड: पीटर मूर, अँड्र्यू बालबर्नी (कर्णधार), कर्टिस कॅम्फर, हॅरी टेक्टर, पॉल स्टर्लिंग, लॉर्कन टकर (यष्टीरक्षक), अँडी मॅकब्राइन, मार्क अडायर, बॅरी मॅकार्थी, मॅथ्यू हम्फ्रीज, क्रेग यंग