Zimbabwe National Cricket Team vs Afghanistan National Cricket Team, 1st T20 Match 2024 Scorecard Update: झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ (ZIM vs AFG) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना 11 डिसेंबर रोजी हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळवण्यात गेला. पहिल्या टी-20 सामन्यात झिम्बाब्वेने अफगाणिस्तानचा चार विकेट्सने पराभव केला आहे. यासह झिम्बाब्वेने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेत झिम्बाब्वेची कमान सिकंदर रझाकडे आहे. तर अफगाणिस्तानचे नेतृत्व राशिद खान करत आहे. (हे देखील वाचा: Zimbabwe vs Afghanistan T20I Stats: टी-20 मध्ये झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यात कसा आहे विक्रम? येथे पहा हेड टू हेड आकडेवारी; सर्वाधिक धावा आणि विकेट घेणारे खेळाडू)
येथे वाचा स्कोरकार्ड
दरम्यान, पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या अफगाणिस्तान संघाची सुरुवात निराशाजनक झाली आणि अवघ्या 33 धावा करून संघाचे चार फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले. अफगाणिस्तान संघाने 20 षटकात 6 गडी गमावून 144 धावा केल्या. अफगाणिस्तानसाठी करीम जनातने सर्वाधिक नाबाद 54 धावांची स्फोटक खेळी खेळली. या शानदार खेळीदरम्यान करीम जनातने 49 चेंडूत पाच चौकार मारले. करीम जनातशिवाय मोहम्मद नबीने 44 धावा केल्या.
A win off the last ball 🥵
SCORECARD: https://t.co/caSRddMNkA | #ZIMvAFG pic.twitter.com/EU7KWVrykK
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) December 11, 2024
रिचर्ड नगारवाने घेतल्या सर्वाधिक तीन विकेट
दुसरीकडे, रिचर्ड नगारवाने झिम्बाब्वे संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. झिम्बाब्वेसाठी रिचर्ड नगारवाने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. रिचर्ड नगारवाशिवाय ब्रायन बेनेट, ट्रेव्हर ग्वांडू आणि वेलिंग्टन मसाकादझा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. हा सामना जिंकण्यासाठी झिम्बाब्वे संघाला 20 षटकात 145 धावा करायच्या होत्या.
ब्रायन बेनेटने केल्या 49 धावा
लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या झिम्बाब्वे संघाची सुरुवात निराशाजनक झाली आणि अवघ्या 11 धावांवर संघाला पहिला मोठा धक्का बसला. झिम्बाब्वे संघाने 20 षटकांत सहा विकेट गमावून लक्ष्य गाठले. झिम्बाब्वेकडून सलामीवीर ब्रायन बेनेटने सर्वाधिक 49 धावांची खेळी खेळली. या झंझावाती खेळीदरम्यान ब्रायन बेनेटने 49 चेंडूत पाच चौकार मारले. ब्रायन बेनेटशिवाय डिऑन मायर्सने 32 धावा केल्या.
नवीन-उल-हकने सर्वाधिक घेतले तीन बळी
नवीन-उल-हकने अफगाणिस्तान संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. अफगाणिस्तानकडून नवीन-उल-हकने सर्वाधिक तीन बळी घेतले. नवीन-उल-हकशिवाय रशीद खानने दोन बळी घेतले. मालिकेतील दुसरा सामना शुक्रवार 13 डिसेंबर रोजी हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लब येथे संध्याकाळी 5 वाजता खेळवला जाईल.