टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) स्वतःच्या फलंदाजीच्या कौशल्य आणि विनोद वृत्तीची ओळखला जातो. मंगळवारी स्पिनरने त्याच्या विनोदी वृत्तीचे आणखी एक उदाहरण दाखवून दिले जेव्हा त्याने केएल राहुल (KL Rahul) आणि कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) सह एक सारख्या शॉटच्या स्थितीत बॅट धरुन पोज केलेला कोलज पोस्ट केला आणि त्यांना ट्रोल केले. यामध्ये राहुल आणि विराट लाईव्ह मॅचमध्ये शॉट खेळत आहे, तर चहल सराव सत्रात शॉट खेळण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. सध्या टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यावर असून आज ते हॅमिल्टनमध्ये तिसरा टी-20 सामना खेळणार आहे. हा सामना जिंकून एकीकडे टीम इंडिया मालिका जिंकेल, तर किवी संघ मालिकेत आव्हान कायम ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. या महत्वपूर्ण सामन्याआधी चहलने शेअर केलेला कोलाज पाहून तुम्हाला नक्की हसू अनावर होईल. (Video: हॅमिल्टन पोहचली टीम इंडिया, युजवेंद्र चहल याने प्रवासादरम्यान एमएस धोनी च्या सन्मानार्थ टीम बसमधील 'या' कामाचा केला खुलासा)
"जेव्हा ते माझा शॉट कॉपी करण्याचा प्रयत्न करीत असतात. वाईट नाही, हे चालू ठेवा.' चहल, राहुल आणि कोहली सध्या न्यूझीलंडमध्ये आज तिसरा टी-20 सामना खेळणार आहे. ऑकलंडमधील ईडन पार्क येथे खेळले गेलेले पहिले दोन सामने भारताने जिंकले. तिसरा सामना हॅमिल्टनमध्ये खेळला जाईल. त्यानंतर चौथा सामना शुक्रवारी वेलिंग्टनमध्ये आणि सामना 2 फेब्रुवारी, रविवारी माउंट मौनगुनी येथे खेळला जाईल. पाहा चहलने शेअर केलेला हा फोटो:
When they trying to copy my shot 😂🤣😜 not bad keep it up youngsters 🙈🙏🏻 @BCCI 🇮🇳 pic.twitter.com/1tirLi1eS8
— Yuzvendra Chahal (@yuzi_chahal) January 28, 2020
दरम्यान, न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या सामन्यात विराट आणि राहुलच्या नजरा जागतिक विक्रमावर असतील. तिसऱ्या सामन्यात एक अर्धशतक करताच राहुल सलग अर्धशतकं करणारा पहिला फलंदाज बनेल. अखेरच्या 3 सामन्यात राहुलने सलग तीन अर्धशतकं केली आहेत. जर त्याने बुधवारी हॅमिल्टनमध्ये आणखी एक अर्धशतकी कामगिरी बजावली तर तो ब्रेंडन मॅक्युलम आणि क्रिस गेल यांच्या संयुक्त विक्रमाची बरोबरी करेल.