Yashasvi Jaiswal (Photo Credit - X)

Australia National Cricket Team vs India National Cricket Team, 5th Test Match Day 2:  ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट विरुद्ध भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ (Test Series)  यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना ३ जानेवारीपासून खेळवला जात आहे. सिडनीतील (Sydney) सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर (Sydney Cricket Ground) दोन्ही संघांमधील चौथा सामना खेळला जात आहे. चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 184 धावांनी पराभव केला. यासह ऑस्ट्रेलियन संघाने मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. सिडनी कसोटीत टीम इंडियाची कमान जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah)  हाती आहे. तर ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व पॅट कमिन्सकडे (Pat Cummins)  आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाने 32 षटकात 6 गडी गमावून 141 धावा केल्या होत्या. टीम इंडियाने 145 धावांची आघाडी घेतली आहे.  (हेही वाचा  - IND vs AUS 5th Test 2025 Day 2 Full Highlights: सिडनी कसोटी रोमांचक वळणावर, भारताने घेतली 145 धावांची आघाडी; येथे पाहा दुसऱ्या दिवसाचे संपूर्ण हायलाइट्स एका क्लिकवर )

दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली आणि दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी 42 धावांची भागीदारी केली. टीम इंडियासाठी स्फोटक फलंदाज आणि यष्टीरक्षक ऋषभ पंतने सर्वाधिक 61 धावांची खेळी खेळली. या स्फोटक खेळीदरम्यान ऋषभ पंतने अवघ्या 33 चेंडूत सहा चौकार आणि चार षटकार ठोकले. रवींद्र जडेजा आठ आणि वॉशिंग्टन सुंदर सहा धावांसह खेळत आहेत.

दुसऱ्या डावात टीम इंडियाचा स्फोटक सलामीवीर यशस्वी जैस्वालने वेगवान सुरुवात करून मिचेल स्टार्कच्या चेंडूंवर 16 धावा केल्या. पहिल्या चेंडूवर आऊट झाल्यानंतर यशस्वी जैस्वालने ऑस्ट्रेलियाच्या सर्वात मारक वेगवान गोलंदाजाच्या चेंडूंवर चौकारांची हॅट्ट्रिक साधली. यशस्वी जैस्वालने सहा चेंडूत 16 धावा केल्या आणि षटक आणखी चौकाराने संपवली. मिच स्टार्कच्या चेंडूवर 16 धावा करत यशस्वी जैस्वालने इतिहास रचला आहे.