IND vs WI 1st Test: अवघ्या 21 वर्षांच्या यशस्वी जैस्वालने (Yashasvi Jaiswal) आपल्या कसोटी पदार्पणातच खळबळ उडवून दिली आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध डॉमिनिका येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी जयस्वालने धडाकेबाज शतक ठोकले. जयस्वालने 16 चेंडूत आपले खाते उघडले, त्यानंतर तो थांबला नाही. एकामागून एक शानदार फटके खेळत त्याने विंडीजच्या गोलंदाजांचा क्लास घेतला. जैस्वालने 215 चेंडूत 11 चौकार मारत शतक झळकावले. यासह त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. यशस्वी जैस्वाल भारताबाहेर कसोटी पदार्पणात शतक झळकावणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला. त्याचबरोबर कसोटी पदार्पणात शतक झळकावणारा तो तिसरा भारतीय फलंदाज बनला. यापूर्वी शिखर धवनने मोहालीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध तर पृथ्वी शॉने राजकोटमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी शतक झळकावले होते.
जयस्वालने शतक झळकावल्यानंतर टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. जैस्वालने आपले शतक पूर्ण केल्यानंतर वरिष्ठांसमोर मान टेकवून रोहित शर्माकडून टाळ्या मिळवल्या. यासह रोहित-यशस्वीने विंडीजविरुद्ध सर्वात मोठ्या भागीदारीचा विक्रम केला. या दोन्ही फलंदाजांनी 202 धावा करत वीरेंद्र सेहवाग आणि वसीम जाफरचा विक्रम मोडला. (हे देखील वाचा: Yashasvi Jaiswal Century: 'ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे' पदार्पणाच्याच सामन्यात शतक झळकावल्यानंतर यशस्वी जैस्वाल झाला भावूक, पहा व्हिडिओ)
कसोटी पदार्पणात भारताचा सलामीवीर म्हणून शतक
187 - शिखर धवन विरुद्ध ऑस्ट्रेलिया, मोहाली, 2013
134 – पृथ्वी शॉ विरुद्ध वेस्ट इंडिज, राजकोट, 2018
100* - यशस्वी जैस्वाल विरुद्ध वेस्ट इंडिज, डॉमिनिका, 2023
वेस्ट इंडिजविरुद्ध भारताची सर्वात मोठी सलामीची भागीदारी
209* – रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल, डॉमिनिका, 2023
201 - वीरेंद्र सेहवाग आणि वसीम जाफर, मुंबई
159 - वीरेंद्र सेहवाग आणि वसीम जाफर, ग्रॉस
153 – सुनील गावस्कर आणि चेतन चौहान, मुंबई
136 - सुनील गावस्कर आणि अंशुमन गायकवाड, किंग्स्टन