IND vs NZ (Photo Credit - X)

IND vs NZ 1st Test 2024: बंगळुरू येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने भारताचा 8 गडी राखून पराभव केला. सामन्याच्या पाचव्या दिवशी किवी संघाला विजयासाठी 107 धावा करायच्या होत्या, जे पाहुण्या संघाने 2 गडी गमावून पूर्ण केले. शेवटच्या दिवशी रचिन रवींद्र आणि विल यंग यांच्यातील 72 धावांच्या भागीदारीने टीम इंडियाचा विजय निश्चित केला. सामन्याच्या पाचव्या दिवशी भारताकडून विकेट घेणारा एकमेव गोलंदाज जसप्रीत बुमराह होता, ज्याने 2 फलंदाजांना बाद केले. न्यूझीलंडने 36 वर्षांनंतर भारतात कसोटी सामना जिंकला आहे. या पराभवामुळे संघाला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेतही भारताचे मोठे नुकसान झाले आहे.

भारताच्या विजयाच्या टक्केवारीत नुकसान

पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघ 74.24 च्या विजयाच्या टक्केवारीसह अव्वल होता, परंतु आता पराभवानंतर संघाची विजयाची टक्केवारी 68.06 वर आली आहे. मात्र, त्यानंतरही भारत गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. या यादीत ऑस्ट्रेलिया 62.50 विजयाच्या टक्केवारीसह दुसऱ्या स्थानावर आहे. (हे देखील वाचा: New Zealand Beat India: बंगळुरू कसोटीत न्यूझीलंडचा दणदणीत विजय, भारतावर 8 विकेट्सने केली मात; मालिकेत 1-0 घेतली अशी आघाडी)

न्यूझीलंडच्या संघाची चौथ्या स्थानांवर झेप

भारताचा पराभव करत न्यूझीलंड संघाने चौथ्या स्थानावर मजल मारली आहे. आता त्यांची विजयाची टक्केवारी 44.44 झाली आहे. तर इंग्लंड पाचव्या स्थानावर पोहचला असुन विजयाच्या टक्केवारी 43.06 झाली आहे. तसेच दक्षिण आफ्रिका सहाव्या स्थानावर असुन त्यांची विजयाची टक्केवारी 38.89 आहे. बांगलादेशचा संघ सातव्या स्थानावर आहे, ज्याची विजयाची टक्केवारी 34.38 आहे. पाकिस्तानची विजयाची टक्केवारी आता 25.93 वर पोहोचली आहे आणि वेस्ट इंडिज 18.52 टक्के सामने जिंकून शेवटच्या स्थानावर आहे. सध्या, केवळ भारत, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि इंग्लंडला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 च्या अंतिम फेरीत पोहोचण्याची शक्यता आहे. डब्ल्यूटीसी फायनल जून 2025 मध्ये इंग्लंडमध्ये खेळली जाईल.