![](https://mrst1.latestly.com/uploads/images/2025/02/1-822274477.jpg?width=380&height=214)
WPL 2025: महिला प्रीमियर लीग सुरु झाल्यापासून क्रिकेट प्रेमींकडून या लीगला चांगलाच प्रतिसाद पाहायला मिळत आहे. आता प्रतीक्षा संपली असून महिला प्रीमियर लीगला आजपासून सुरुवात होणार आहे. क्रिकेट प्रेमींना पहिल्या दिवशीच रोमांचक सामना पाहायला मिळणार असून गतवर्षी विजेत्या ठरलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) आणि गुजरात जायंट्स (जीजी) यांच्यात सामना रंगणार आहे. महिला प्रीमियर लीगचा पहिला सामना हा आज वडोदरा येथील कोतंबी स्टेडियमवर होणार आहे. यंदा ही लीग वडोदरा येथून सुरू होऊन बेंगळुरू, लखनऊ आणि मुंबई या चार ठिकाणी होणार आहे. WPL 2025 मध्ये 20 ग्रुप-स्टेज सामने आणि दोन नॉकआउट खेळ होतील. सर्व संघ तयार आहेत आणि सुरुवातीपासूनच दमदार प्रदर्शन करण्यासाठी सज्ज आहेत. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू हि मागच्या वर्षी विजेता ठरली होती. त्यामुळे आज होणारा सामना चांगला रोमांचित होणार आहे.
कुठे पाहता येणार सामना, जाणून घ्या थेट प्रक्षेपणासंबंधी माहिती
डब्ल्यूपीएल 2025 चे थेट प्रक्षेपण तुम्हाला स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर पाहायला मिळणार आहे. जिओसिनेमावर डब्ल्यूपीएल 2025 चे लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध होणार आहे.
महिला प्रीमियर 2025 मध्ये सहभागी झालेले संघ, येथे पाहा
गुजरात जायंट्स
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
मुंबई इंडियन्स
दिल्ली कॅपिटल्स
यूपी वॉरियर्स
कसे होणार सामने, येथे पाहा
साखळी फेरी 11 मार्चपर्यंत चालेल, त्यानंतर 13 मार्चला एलिमिनेटर होईल आणि शेवटी स्पर्धेचा अंतिम सामना 15 मार्च रोजी मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे. सर्व सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होतील. नाणेफेक संध्याकाळी 7 वाजता होणार आहे.