ICC WTC Final Playing Conditions: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) शुक्रवारी साऊथॅम्प्टन (Southampton) येथील हॅम्पशायर बाऊल येथे भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात होणाऱ्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी (ICC World Test Championship Final) नियमावली जाहीर केली आहे. खेळण्याच्या अटींनुसार अंतिम सामन्यात ड्रॉ किंवा अनिर्णित राहिल्यास दोन्ही संघांना संयुक्त विजेते घोषित केले जाईल तसेच फायनल सामन्यांच्या नियमित दिवसात वाया गेलेल्या ओव्हर किंवा वेळेची भरपाई करण्यासाठी राखीव दिवसही ठेवण्यात आला आहे. सामन्यात पाऊस पडला असेल किंवा खराब प्रकाश पडल्यामुळे व्यत्यय आला तर सामन्याचे उर्वरित ओव्हर रिझर्व्ह डे रोजी खेळले जातील. आयसीसी कसोटी वर्ल्ड कपचा अंतिम सामना 18 ते 22 जून दरम्यान खेळला जाणार असून 23 जून हा दिवस रिझर्व्ह डे (Reserve Day) म्हणून ठेवला जाईल. हे दोन्ही निर्णय आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सुरू होण्यापूर्वी जून 2018 मध्ये घेण्यात आले होते. (ICC WTC Combined Playing XI: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2019-2021 आपल्या अंतिम टप्प्यात, पहा ICC कसोटी वर्ल्ड कप स्पर्धेचा सर्वोत्तम संयुक्त प्लेइंग XI)
पूर्ण पाच दिवसांच्या खेळाची खात्री करुन घेण्यासाठी रिझर्व्ह डे ठेवण्यात आला आहे आणि दररोज हरवलेल्या वेळ पूर्ण करण्याच्या सामान्य तरतुदीद्वारे गमावलेला वेळ पूर्ण करण्यासाठी याचा उपयोग तेव्हाच केला जाईल. पूर्ण पाच दिवसांच्या खेळानंतरही सकारात्मक निकाल न मिळाल्यास अतिरिक्त दिवसाचा खेळ होणार नाही आणि अशा परिस्थितीत सामना अनिर्णित घोषित केला जाईल. सामन्यादरम्यान वेळ गमावल्यास, आयसीसी मॅच रेफरी नियमितपणे संघ आणि माध्यमांना रिझर्व्ह डे कसा वापरता येईल याविषयी अपडेट करतील. शिवाय, राखीव दिवसाच्या वापराच्या अंतिम निर्णयाची घोषणा पाचव्या दिवशी शेवटच्या क्षणी नियोजित वेळेस होईल. सामना ग्रेड 1 ड्यूक्स क्रिकेट बॉलने खेळला जाईल. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामन्यात बांग्लादेश आणि श्रीलंका यांच्यात सुरू असलेल्या आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप सुपर लीग सीरिजमध्ये राबविण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याच्या परिस्थितीतही बदल पाहायला मिळेल.
World Test Championship Final playing conditions announced https://t.co/ku0FTaSAeL via @ICC
— ICC Media (@ICCMediaComms) May 28, 2021
शॉर्ट रन: मैदानावरील अंपायरने दिलेल्या शॉर्ट-रनच्या निर्णयाचा रिव्यू थर्ड अंपायर करेल.
खेळाडूंचा रिव्यू: LBW चा निकाल दिल्यानंतर कर्णधार किंवा बाद झालेला खेळाडू मैदानावरील अंपायरकडे चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला होता का? याबाबत विचारणा करून रिव्यू घेऊ शकतो.
DRS रिव्यू: एलबीडब्ल्यूसाठी स्टम्पवर आदळणाऱ्या चेंडूची लांबी व उंची यावरून अम्पायर्स कॉलचा निर्णय घेतला जाईल.