ICC World Test Championship Final: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गणितात होऊ शकते बदल, अशा प्रकारे घेतला जाईल फायनलमधील दोन संघांचा निर्णय
(Photo Credits: Twitter / @BCCI)

ICC World Test Championship Final: आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची (World Test Championship) उद्घाटन आवृत्ती कोरोना व्हायरसमुळे पूर्णपणे विस्कळीत झाल्यामुळे आयसीसी (ICC) प्रथम चक्र कसे पूर्ण करावे यावरील संभाव्य विचारमंथन करीत आहे. अहवालानुसार, टेस्ट चॅम्पियनशिपसाठी संघांकडे असलेल्या गुणसंख्येने नव्हे तर त्यांनी प्रत्यक्षात कमावलेल्या गुणांच्या टक्केवारीनुसार अंतिम दोन संघाची निवड केली जाईल. द्वितीय द्विपक्षीय कसोटी मालिकेला महत्व देण्यासाठी डब्ल्यूटीसीची (WTC) सुरुवात गेल्या वर्षी आयसीसीकडून करण्यात आली होती. स्वरूपानुसार, आघाडीचे नऊ संघात दोन वर्षांत सहा मालिका खेळल्या जातील, त्यातील गुणतालिकेतील पहिले दोन संघ लॉर्डस् (Lords) येथे आयोजित होणाऱ्या अंतिम फेरीत पोहचतील. महामारीच्या पार्श्वभूमीवर अंतिम सामना पुढे ढकलला जाऊ शकतो अशी भीती व्यक्त केली जात होती पण आयसीसीने अद्याप माघार घेतलेली नाही आणि अंतिम फेरी वेळेत होईल हे सुनिश्चित करण्यासाठी, प्रशासकीय मंडळ सध्या अनेक उपायांवर विचार करीत आहे. (ICC World Test Championship: आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये पॉईंट्स शेअर करण्याच्या आयसीसी विचारत, भारतीय संघावर होणार परिणाम?)

PTIने ESPNcricinfoच्या अहवालानुसार म्हटले की आयसीसीच्या क्रिकेट समितीकडून या चॅम्पियनशिपच्या पहिल्या आवृत्तीसाठी या पर्यायावर विचार केला जात आहे परंतु अंतिम निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी समिती येत्या आठवड्यात घेईल. “वर्ल्ड टेस्ट चँपियनशिप (डब्ल्यूटीसी) च्या फायनलिस्टचा निर्णय स्पर्धेतून संघांनी लढलेल्या गुणांच्या टक्केवारीद्वारे निश्चित केला जाईल,” अहवालात म्हटले आहे. आयसीसीची वर्षाची शेवटची तिमाही बैठक सोमवारी सुरू होत आहे. हवालात पुढे म्हटले आहे की समिती कसोटी सामने जे सर्व महामारीमुळे खेळू शकता आले नाही त्यांना ड्रॉ समजून गुण बरोबरीत वाटून देण्याचाही विचार केला जात आहे.

नव्या प्रस्तावानुसार, “जर ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध चारही कसोटी गमावल्यास आणि इंग्लंड विरुद्ध पाचही सामने जिंकल्यास त्यांचे 480 गुण आणि टक्केवारी 66.67 अशी होईल. “जर ते इंग्लंडविरुद्ध पाचही सामने जिंकतात आणि ऑस्ट्रेलियाकडून त्यांचा 3-1 असा पराभव झाल्यास त्यांचे 510 गुण आणि 70.83 टक्के असतील. जर इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाने 5-0 विजय मिळवला आणि ऑस्ट्रेलियाकडून 2-0 ने पराभूत झाला तर त्यांचे 500 गुण आणि 69.44 टक्के होतील. न्यूझीलंडने घरी 240 गुण मिळवले तर ऑस्ट्रेलियामध्ये दोन ड्रॉ देखील भारताला पुरेसे ठरणार नाहीत.” भारत ऑस्ट्रेलियामध्ये चार कसोटी सामने खेळणार असून त्यानंतर पाच कसोटी सामन्यांसाठी इंग्लंड भारताचा दौरा करणार असल्याने दोन मालिकेचे निकाल उद्घाटक WTCचे दोन अंतिम संघ निश्चित करतील.