रीस टोपलेच्या चार विकेट्स आणि डेव्हिड मलानच्या 140 धावांच्या जलद खेळीमुळे इंग्लंडने बांग्लादेशचा 137 धावांनी पराभव केला. ICC ODI World Cup 2023 चा सातवा सामना आज इंग्लंड विरुद्ध बांगलादेश यांच्यात खेळला गेला. पहिल्या सामन्यात पराभव झाल्यानंतर गतविजेत्या इंग्लंडने आज 9 गडी राखून बांग्लादेशचा पराभव करुन चांगले पुनरागमन केले. धर्मशाला येथे मंगळवारी झालेल्या विश्वचषक 2023 सामन्यात बांगलादेशचा कर्णधार शकीब अल हसन याने नाणेफेक जिंकून इंग्लंडला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने 9 गडी गमावून 364 धावा केल्या. ज्यामध्ये डेव्हिड मलानने 107 चेंडूत 140 धावा केल्या. तर जॉनी बेअरस्टोने 52(59) आणि रूटने 82(68) धावा केल्या. तर महेदी हसनने 8 षटकात 71 धावा देत 4 बळी घेतले. शोरगुलवाला इस्लामने 3 बळी घेतल्या. पण फलंदाज आपल्या संघासाठी काही खास करू शकले नाहीत त्यामुळे त्यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)