महिला टीम इंडियाची (India) कर्णधार हरमनप्रीत कौरने (Harmanpreet Kaur) शानदार कामगिरी करत ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या तिरंगी मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारताला शानदार विजय मिळवून दिला. टी -20 महिला विश्वचषक होण्यापूर्वी भारतीय संघ (Indian Team) सध्या यजमान ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (England) यांच्यासह तीन देशांची टी-20 मालिका खेळत आहे. मालिकेचा पहिला सामना भारत आणि इंग्लंड संघात खेळवण्यात आला. शुक्रवारी झालेल्या या सामन्यात हरमनप्रीतने नाबाद 42 धावांची खेळी केली. टीम इंडियाला विजयासाठी 148 धावांचे लक्ष्य मिळाले होते, जे हरमनप्रीतच्या डावामुळे तीन चेंडू शिल्लक असताना संघाने 150 धावा केल्या. हरमनप्रीतशिवाय 16 वर्षीय सलामी फलंदाज शेफाली वर्माने 30 आणि जेमीमाह रॉड्रिग्सने 26 धावा केल्या. भारताच्या विजयात गोलंदाजांनी महत्वाची भूमिका बजावली. त्यांनी इंग्लंडला 147 धावांवर रोखले. (Women's Tri-Series 2020: स्मृती मंधाना झेलबाद झाल्याचा इंग्लंडच्या एमी जोन्स हिचा अंपायरकडे दावा, नेटीझन्सनी 'Cheater' म्हणून केली संभावना WATCH)
शेवटच्या षटकात 6 धावांची गरज असताना हरमनप्रीतने असताना हरमनप्रीतने जोरदार षटकार खेचला आणि भारताने पाच विकेट गमावून 150 धावा करत लक्ष्य गाठले. हरमनप्रीतने तिच्या डावात 5 चौकार आणि 1 षटकार मारला. या सामन्यात हरमनप्रीतने धावांचा पाठलाग करताना 12 व्या वेळी नाबाद राहण्याचा पराक्रम केला. महिला टी-20 क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक वेळा नाबाद राहणारी हरमनप्रीत दुसरी खेळाडू ठरली. टीम इंडियाची कर्णधार सर्वाधिक 13 व्या वेळी धावांचा पाठलाग करताना नाबाद राहिली आहे. यामध्ये भारताला केवळ एकदा पराभवाचा सामना करावा लागला आहे. पाहा हरमनप्रीतच्या षटकाराचा हा व्हिडिओ:
Harmanpreet Kaur with the inside out cover drive to get India home with three balls remaining! #ENGvIND pic.twitter.com/lbhXY6FBtm
— #7Cricket (@7Cricket) January 31, 2020
दरम्यान, भारतीय संघाला अखेरच्या दोन ओव्हरयामध्ये 17 धावांची आवश्यकता होती, अशा नाजूक प्रसंगी इंग्लंडने झेल सोडल्यानंतर भारतीय संघाला फायदा झाला, त्यानंतर हरमनप्रीतने षटकार खेचत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. इंग्लंडकडून कर्णधार हीथर नाइट ने 67 धावांचा डाव खेळला. इंग्लंडची सलामी जोडी अॅमी जोन्स आणि डॅनी व्याट काही खास खेळ करू शकले नाही. भारताकडून राजेश्वरी गायकवाड, शिखा पांडे आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.