सुपरनोवा (Photo Credit: Twitter/IPL)

Women's T20 Challenge Final: हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) नेतृत्वातील सुपरनोवाने (Supernovas) महिला टी-20च्या अंतिम सामन्यात वेलोसिटी (Velocity) संघाचा 4 धावांनी पराभव करत स्पर्धेचे तिसरे जेतेपद पटकावले. सुपरनोवाने पहिले फलंदाजी करत 166 धावांचे आव्हान दिले होता. प्रत्युत्तरात वेलोसिटी संघ 20 षटकांत 161 धावाच करू शकले. लॉरा वोल्वार्डने (Laura Wolvaardt) वेलोसिटीसाठी सर्वाधिक धावांची 65 नाबाद खेळी केली. पण खराब फलंदाजीने संघाचा घात केला परिणामी त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. सुपरनोवासाठी अलाना किंगने सार्वधिक तीन विकेट्स घेतल्या. तर सोफी एक्लेस्टोन आणि डिआंड्रा डॉटिनने 2-2 बळी घेतले. वोल्वार्ड आणि सिमरन बहादूर यांनी मोक्याच्या क्षणी मोर्चा सांभाळला, सुपरनोवासाठी सोफी एक्लेस्टोनने शिस्तबद्ध गोलंदाजी करत संघाच्या झोळीत तिसरे जेतेपद टाकले.

भारताची दिग्गज अष्टपैलू हरमनप्रीत कौर तीन जेतेपदासह सर्वात यशस्वी कर्णधार ठरली आहे. शेवटच्या षटकात वेलोसिटीला विजयासाठी 17 धावांची गरज होती मात्र एक्लेस्टोनने केवळ 12 धावाच दिल्या. यासह वोल्वार्डची अर्धशतकी खेळी व्यर्थ ठरली. स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघाने 165 धावसंख्येचा यशस्वी बचाव केला आणि वेलोसिटीला 161 धावांत रोखले. शेफाली वर्मा आणि यास्तिका भाटिया यांनी वेलोसिटीकडून जोरदार सुरुवात केली. पण शेफाली तिसऱ्याच षटकात आठ चेंडूत 15 धावा काढून बाद झाली. यास्तिकाही जास्त वेळ क्रीझवर राहू शकली नाही आणि चौथ्या षटकात नो बॉलवर 13 धावा काढून पॅव्हिलियनमध्ये परतली. यावेळी किरण नवगिरे देखील निराश केली आणि 13 चेंडूत खाते न उघडता बाद झाली. नट्ट्कम चांथमनेही अवघ्या सहा धावा केल्या. संघाला सांभाळण्याची जबाबदारी कर्णधार दीप्ती शर्मावर होती पण ती देखील दोन धावा करून बाद झाली. स्नेह राणा आणि वोल्वार्ड यांनी मिळून डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला व सहाव्या विकेटसाठी 27 चेंडूत 40 धावा केल्या. पण 16व्या षटकात अलाना किंगने पुढच्याच चेंडूवर स्नेह आणि त्यानंतर राधा यादवला बाद करून वेलोसिटीच्या आशा पल्लवीत मावळल्या. त्यानंतर केट क्रॉसने झटपट धावा काढण्याचा प्रयत्न केला पण तिने सात चेंडूत 13 धावा केल्यानंतरही पुढे जात राहिली. दुसऱ्या टोकाला वुलफार्टने 33 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.

सुपरनोवासकडून सलामीवीर डिआंड्रा डॉटिनने 62 धावांची शानदार खेळी केली. डॉटिनने 44 चेंडूत 1 चौकार आणि 4 षटकार ठोकले. डायंड्राने प्रिया पुनिया (28) सोबत 73 धावांची सलामी दिली. त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर (43) सोबत दुसऱ्या विकेटसाठी 58 धावा जोडल्या.