IND vs SL Series 2024: झिम्बाब्वे दौऱ्यानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यासाठी सज्ज (IND vs SL) झाली आहे. येथे भारतीय संघ 27 जुलैपासून तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. यानंतर 2 ऑगस्टपासून वनडे मालिका सुरू होईल. जी 7 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. टी-20 मालिकेचे कर्णधारपद सूर्यकुमार यादवकडे (SuryaKumar Yadav) सोपवण्यात आले आहे, तर रोहित शर्मा (Rohit Sharma) वनडे मालिकेचे नेतृत्व करताना दिसणार आहे. विराट कोहलीलाही (Virat Kohli) वनडे संघात स्थान देण्यात आले आहे. नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीर (Gautam Gambhir) पहिल्यांदाच टीम इंडियाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. अशा परिस्थितीत ही मालिका चाहत्यांसाठी खूप खास असणार आहे. दरम्यान, भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यांचा विनामूल्य आनंद कसा लुटता येईल ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत...
सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर सामने पाहता येतील
मिळालेल्या माहितीनुसार, भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेतील सामने सोनी स्पोर्ट्स नेटवर्क चॅनलवर टीव्हीवर पाहता येतील. याचा आनंद सोनी टेन स्पोर्ट्स चॅनेलवर घेता येईल. सोनी लिव्ह ॲपवर तुम्ही मोबाईलवर सामने पाहू शकता. तथापि, यासाठी सदस्यता आवश्यक असेल. हे पॅकेज 399 रुपयांपासून 1499 रुपयांपर्यंत मिळू शकते. (हे देखील वाचा: Team India Sri Lanka Tour 2024: टीम इंडियाचा फलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी प्रशिक्षक कोण असेल? रिपोर्टनुसार ही नावे आली पुढे)
Surya Dada's 🏏 does all the talking 🤩
Impressive stats by the newly appointed T20I Skipper of 🇮🇳🫡
Watch #SLvIND LIVE from 27th July on #SonyLIV 🍿 pic.twitter.com/7p2HozzU55
— Sony LIV (@SonyLIV) July 20, 2024
मोफत कसा घेवू शकता सामन्याचा आनंद?
या मालिकेचे सामने विनामूल्य पाहण्याची युक्ती वापरून पाहता येईल. तुमच्या मोबाईलवर Jio TV ॲप डाउनलोड करा. तुमच्याकडे जिओ सिम असले किंवा नसले तरी काही फरक पडणार नाही. Jio TV ॲप डाउनलोड केल्यानंतर, तुमचा Jio नंबर किंवा तुमच्या मित्रांचा किंवा कुटुंबाचा कोणताही Jio नंबर टाका. त्यानंतर त्या नंबरवर एक ओटीपी पाठवला जाईल. जे प्रविष्ट करून तुम्ही Jio TV ॲपवर मोफत प्रवेश मिळवू शकाल. यानंतर सर्च ऑप्शनमध्ये सोनी लिव्ह किंवा सोनी स्पोर्ट्स चॅनल सर्च करा. जिथे तुम्हाला हे सामने मोफत बघायला मिळतील. या युक्तीने चाहत्यांनी भारत-झिम्बाब्वे मालिकेतील सामन्यांचाही आनंद लुटता येईल.
भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेचे वेळापत्रक
टी-20 सामन्याचे वेळापत्रक
पहिला टी-20 सामना, 27 जुलै 2024, पल्लेकेले, संध्याकाळी 7 वाजता (भारतीय वेळेनुसार)
दुसरा टी-20 सामना, 28 जुलै 2024, पल्लेकेले, संध्याकाळी 7 वाजता
तिसरा टी-20 सामना, 30 जुलै 2024, पल्लेकेले, संध्याकाळी 7 वाजता
एकदिवसीय सामन्याचे वेळापत्रक
पहिली एकदिवसीय सामना, 2 ऑगस्ट, 2024, कोलंबो, दुपारी 2.30 वाजता
दुसरा एकदिवसीय सामना, 4 ऑगस्ट 2024, कोलंबो, दुपारी 2.30 वाजता
तिसरा एकदिवसीय सामना, 7 ऑगस्ट, 2024, कोलंबो, दुपारी 2.30 वाजता
श्रीलंका दौऱ्यासाठी भारताचा टी-20 संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, रवी बिश्रणोई. अर्शदीप सिंग, खलील अहमद, मोहम्मद सिराज
श्रीलंका दौऱ्यासाठी भारताचा एकदिवसीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अक्षर पटेल, खलील अहमद, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, हर्षित राणा.