Virender Sehwag Divorce: युजवेंद्र चहलच्या घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान, आणखी एका भारतीय क्रिकेटपटूचे नाते तुटण्याच्या मार्गावर आहे. जर मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) आणि त्यांची पत्नी आरती अहलावत (Aarti Ahlawat) यांचं 21 वर्षांचे लग्न तुटण्याच्या मार्गावर आहे. दोघांनीही एकमेकांना इंस्टाग्रामवर अनफॉलो केले आहे. या जोडप्याचे 2004 मध्ये दिल्लीत लग्न झाले आणि त्यांना दोन मुले आहेत. जर वृत्तांवर विश्वास ठेवला तर, सेहवाग आणि आरती वेगवेगळ्या घरात राहत आहेत आणि लवकरच दोघेही त्यांचे नाते कायदेशीररित्या संपवू शकतात. (हे देखील वाचा: Hardik Pandya Viral Video: चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी हार्दिक पंड्या गुजराती शिकवताना दिसला, सोशल मीडियावर मजेदार व्हिडिओ व्हायरल)
Virender Sehwag, Wife Aarti's Personal Lives In Focus After Report Makes Big 'Separation' Claimhttps://t.co/c9lV4y0Fnr pic.twitter.com/DrqJFZ5Er9
— CricketNDTV (@CricketNDTV) January 24, 2025
21 वर्षांचे नातं तुटणार?
मिळालेल्या माहितीनुसार, वीरेंद्र सेहवागच्या कुटुंबातील एका जवळच्या सदस्याने म्हटले आहे की, आरती आणि सेहवाग गेल्या अनेक महिन्यांपासून एकत्र राहत नाहीत. दोघेही लवकरच घटस्फोटाची औपचारिक घोषणा करू शकतात. तथापि, या जोडप्याच्या घटस्फोटामागील कारण काय आहे हे अद्याप कळलेले नाही. सेहवागने 2004 मध्ये आरतीशी लग्न केले आणि असे म्हटले जाते की त्यांचा प्रेमविवाह होता. दोघांचेही कुटुंब या लग्नासाठी तयार नव्हते.
कोण आहे आरती अहलावत?
आरती अहलावत ही दिल्लीची रहिवासी आहे आणि तिने येथील लेडी इर्विन स्कूलमधून शिक्षण घेतले आहे. तिने दिल्ली विद्यापीठाच्या मैत्री कॉलेजमधून संगणक शास्त्रात डिप्लोमा देखील केला आहे. आरती रिअल इस्टेट क्षेत्रात व्यवसाय करते आणि काही वर्षांपूर्वी तिने तिचा बिझनेस पार्टनर रोहित कक्कर विरोधात पोलिस तक्रारही दाखल केली होती.
सेहवागचे क्रिकेटच्या मैदानावरील यश
वीरेंद्र सेहवाग हा भारतीय क्रिकेटमधील सर्वात धोकादायक फलंदाजांपैकी एक मानला जातो. उजव्या हाताच्या या फलंदाजाने 1999 मध्ये पहिला एकदिवसीय सामना खेळला आणि 2001 मध्ये कसोटी पदार्पण केले. 2007 च्या टी-20 विश्वचषक आणि 2011 च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघातील तो एक महत्त्वाचा सदस्य होता. सेहवाग आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला आणि दिल्ली आणि हरियाणा देशांतर्गत संघांचे प्रतिनिधित्व केले. त्याच्या आक्रमक फलंदाजीसोबतच, सेहवागने कर्णधारपदातही विशेष भूमिका बजावली. तो दिल्ली डेअरडेव्हिल्स (आता दिल्ली कॅपिटल्स) आणि दिल्ली रणजी संघाचा कर्णधार होता.