PC-X

PBKS vs RCB Pitch Report: जर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला आयपीएल 2025 मध्ये त्यांची गाडी पुन्हा रुळावर आणायची असेल, तर त्यांच्या फलंदाजांना पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात चांगली कामगिरी करावी लागेल. शुक्रवारी बेंगळुरूमध्ये पंजाबविरुद्ध ( ) खेळल्या गेलेल्या सामन्यात टिम डेव्हिड वगळता आरसीबीचा कोणताही फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही. परिणामी संघाला पाच विकेट्सनी लादिरवाना पराभव स्वीकारावा लागला. अवघ्या 12 षटकांत संघ पव्हेलियनमध्ये परतला. आता पुन्हा एकदा दोन्ही संघ आमनेसामने येत आहेत. यावेळी हा सामना पंजाबच्या होम ग्राउंड, महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम (Maharaja Vadavindra Singh Stadium), मुल्लानपूर येथे होत आहे.

मुल्लानपूरची खेळपट्टी कशी असेल?

या हंगामात मुल्लानपूरमधील खेळपट्टीवर खेळाडू खूप चांगली कामगिरी करत आहेत. प्रियांश आर्यने सीएसकेविरुद्ध 39 चेंडूत शतक झळकावले. तर पंजाब आणि केकेआर यांच्यातील सामन्यात गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले. 111 धावा केल्यानंतर पंजाबने केकेआरला 95 धावांवर रोखले. म्हणूनच पंजाब आणि आरसीबी यांच्यातील सामन्यापूर्वी लोकांना खेळपट्टीबद्दल जाणून घ्यायचे आहे. शेवटचा सामना वगळता, येथील खेळपट्टी फलंदाजीसाठी सोपी आहे. पंजाब आणि आरसीबी यांच्यातील सामन्यात खेळपट्टी फलंदाजांनाही साथ देऊ शकते.