भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा 10 विकेट्सने मोठा पराभव झाला. या सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी पत्त्यासारखी विखुरली. त्यापैकी सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा अपयशी ठरला आणि शून्यावर बाद झाला. या मालिकेत सलग दुसऱ्यांदा तो गोल्डन डकवर बाद झाला आहे. सूर्यकुमार यादवची (Surya Kumar Yadav) कामगिरी केवळ या सामन्यातच नाही तर वनडेत पदार्पण केल्यापासून खराब होत आहे. तो टी-20 प्रमाणे फटके मारण्याच्या प्रक्रियेत बाद होतो. अशा स्थितीत तिसर्या वनडेत त्याला संधी मिळेल की नाही याबाबत सर्वांच्या मनात शंका आहे. दरम्यान, कॅप्टन रोहित शर्माने (Rohit Sharma) याबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
काय म्हणाला रोहित?
रोहितने सूर्यकुमार यादवचा बचाव केला आणि सामन्यानंतर सांगितले की, 'श्रेयस अय्यरच्या पुनरागमनाबद्दल आम्हाला माहिती नाही, जर त्याची जागा रिक्त झाली तर आम्ही सूर्याला मैदानात उतरवू. त्याने मर्यादित षटकांमध्ये चांगली कामगिरी केली आहे आणि मी अनेकदा सांगितले आहे की ज्यांच्याकडे क्षमता आहे त्यांना संधी मिळेल. रोहित पुढे म्हणाला, 'सूर्याला माहित आहे की त्याला वनडेतही चांगली कामगिरी करायची आहे. क्षमता असलेल्या खेळाडूंना पुरेशी संधी दिली जात नाही असे कधीही वाटू नये, असे मी म्हटले आहे. (हे देखील वाचा: IND vs AUS 1st ODI: ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यानंतरही 'या' भारतीय खेळाडूने कर्णधार रोहितला टाकले मागे, केला अनोखा विक्रम)
सूर्यकुमारला मिळणार संधी
सूर्याच्या कामगिरीबद्दल तो पुढे म्हणाला की, 'गेल्या दोन सामन्यांमध्ये तो लवकर बाद झाला, पण त्याला सात आठ किंवा दहा सलग सामने द्यावे लागतील जेणेकरून तो अधिक आरामदायक होईल. सध्या त्याला कोणी दुखापत झाल्यास किंवा उपलब्ध नसल्यास चान्स मिळत आहे. संघ व्यवस्थापनाचे काम खेळाडूंना संधी देणे आहे आणि जेव्हा त्यांना वाटत असेल की ते सोयीस्कर नाहीत किंवा धावा होत नाहीत, तेव्हा ते याचा विचार करतील. सध्या आम्ही त्या मार्गावर नाही आहोत. सूर्यकुमार यादव तिसरा वनडे खेळणार असल्याचे रोहितच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले आहे.