
Rohit, Virat And Jadeja Retirement: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघातील तीन अनुभवी खेळाडू, रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) हे त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचले आहेत. गेल्या वर्षी भारताच्या टी-20 विश्वचषक विजयानंतर तिघांनीही त्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतून निवृत्ती घेतली होती. आता, आणखी एक आयसीसी स्पर्धा जवळ येत असताना, हे खेळाडू भारतीय क्रिकेटची सेवा किती काळ करत राहतील यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. (हे देखील वाचा: Rohit Sharma Dubai Record: दुबईच्या मैदानात कर्णधार रोहित शर्माचा कसा आहे रेकाॅर्ड, आकडेवारी वाचून तुम्ही व्हाल थक्क!)
भारतीय क्रिकेटमध्ये बदल होणार?
रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा हे भारतीय क्रिकेटमधील सुवर्ण पिढीचे महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. या तिघांनी भारताला अनेक संस्मरणीय विजय मिळवून दिले आहेत आणि संघाला मोठ्या उंचीवर नेले आहे. आता, जर हे तिघेही 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर निवृत्त झाले तर ते भारतीय क्रिकेटसाठी एक मोठा बदल असेल.
तिघांची शेवटची असू शकते आयसीसी स्पर्धा
माजी भारतीय सलामीवीर आणि क्रिकेट विश्लेषक आकाश चोप्रा यांनीने त्याच्या यूट्यूब चॅनलवरील एका व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ही रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांच्यासाठी शेवटची आयसीसी स्पर्धा असू शकते. त्यांनी संकेत दिले की भारतीय संघ व्यवस्थापन आता या तीन दिग्गज खेळाडूंपासून पुढे जाण्याची तयारी करत आहे.
रोहित आणि कोहली 2027 चा विश्वचषक खेळतील का?
आकाश चोप्रा पुढे म्हणाला की, पुढील एकदिवसीय विश्वचषक 2027 मध्ये होईल, पण तोपर्यंत बरेच काही बदलेल. "2027 चा एकदिवसीय विश्वचषक अजून खूप दूर आहे. तोपर्यंत जग खूप बदललेले असेल. मला वाटते की खेळाडूंनाही हे समजले असेल की ही त्यांची शेवटची (आयसीसी) स्पर्धा असू शकते. तथापि, क्रिकेटमध्ये कधीही काहीही होऊ शकते. रोहित, विराट आणि जडेजा हे देखील पुढील एकदिवसीय विश्वचषक खेळू शकतात."
टीम इंडियाला या दिग्गजांची गरज आहे की नाही?
चोप्रा यांनी असेही स्पष्ट केले की, कोहली आणि जडेजासारखे तंदुरुस्त खेळाडू पुढे खेळू शकतात की नाही हा मुद्दाच नाही तर या खेळाडूंशिवाय टीम इंडिया कशी कामगिरी करते हे देखील पाहावे लागेल. चोप्रा म्हणाला, "प्रश्न हा नाही की हे खेळाडू पुढील विश्वचषक खेळू शकतात की नाही, तर भारतीय क्रिकेट संघ त्यांच्याशिवाय पुढे जाण्यास तयार आहे का. आपल्याला हे पाहावे लागेल की भारताला त्यांची गरज आहे की त्यावेळी चांगले पर्याय उपलब्ध असतील. जर चांगले पर्याय असतील तर संघाने त्या दिशेने वाटचाल करावी. म्हणूनच, मला वाटते की रोहित, कोहली आणि जडेजासाठी ही शेवटची आयसीसी स्पर्धा असू शकते."