
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 मधील दोन अपराजित संघ म्हणजे भारत - न्युझीलंड (IND vs NZ) रविवारी, 22 ऑक्टोबर रोजी धर्मशाला येथील HPCA स्टेडियमवर आमनेसामने येतील. दोन्ही संघ सलग 4 सामने जिंकून मैदानात उतरले आहेत आणि त्यांना या स्पर्धेतील विजयाचा सिलसिला वाढवायचा आहे. दोन्ही संघ त्यांच्या प्रमुख खेळाडूंशिवाय असतील. किवी संघाला कर्णधार केन विल्यमसनची उणीव भासणार आहे, तर टीम इंडिया स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्याशिवाय या मोठ्या सामन्यात उतरणार आहे. आयसीसी स्पर्धांमध्ये ब्लॅककॅप्सविरुद्ध टीम इंडियाचा रेकॉर्ड चांगला नाही. एकदिवसीय विश्वचषकात दोन्ही संघ नऊ वेळा आमनेसामने आले आहेत आणि न्यूझीलंडने 5 वेळा विजय मिळवला आहे. दरम्यान, टीम इंडियाला 3 वेळा विजय मिळवण्यात यश आले आहे, तर एक सामना पावसामुळे गमवावा लागला आहे.
कसे असेल धर्माशालामधील हवामान?
जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या दोन संघांमध्ये जोरदार सामना होण्याची अपेक्षा आहे. पण हवामान हे सर्वात मोठे आव्हान म्हणून समोर येईल. AccuWeather नुसार, धर्मशालामध्ये दुपारच्या वेळी वादळी वाऱ्यासह पाऊस पडू शकतो. पावसाची 43 टक्के शक्यता आहे. तापमान सुमारे 13 अंश सेल्सिअस राहील आणि ते 74% ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. सायंकाळनंतर तापमानात आणखी घट होईल आणि शहरात 100 टक्के ढगाळ वातावरण राहील. (हे देखील वाचा: IND vs NZ Head to Head: विश्वचषकात न्यूझीलंडला हरवणे भारतासाठी खूप कठीण, 20 वर्षांपासून होतोय पराभव)
विश्वचषक 2023 साठी भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, इशान किशन, केएल राहुल, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, फिरकी अष्टपैलू: रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जयप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव
न्यूझीलंड संघ:
केन विल्यमसन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, डेव्हन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिच सँटनर, ईश सोधी, टिम साउथी, विल यंग.