युनिव्हर्स बॉस क्रिस गेल (Photo Credit: Twitter)

Universe Boss Chris Gayle: ‘युनिव्हर्स बॉस’ क्रिस गेलच्या (Chris Gayle) 38 चेंडूत 67 धावांच्या जोरावर वेस्ट इंडिजने (West Indies) ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) तिसऱ्या टी-20 सामन्यात 14.5 ओव्हरमध्ये 142 धावांचा यशस्वी पाठलाग करत सहा विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह कॅरेबियन संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. सामन्यात गेलने कामगिरीने मंत्रमुग्ध केले आणि सामन्यानंतर अनेक मजेदार प्रश्नांची उत्तरे दिली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) नव्हे तर क्रिकेटचा आपण ‘तांत्रिकदृष्ट्या बॉस’ असल्याचा विश्‍वास ठेवण्यास आवडेल, असे वेस्ट इंडीजचा फलंदाज गेलने म्हटले आहे. कांगारू संघाविरुद्ध तिसऱ्या टी-20 दरम्यान त्याच्या बॅटवर फक्त 'द बॉस'चा (The Boss) स्टिकर पहिला जाऊ शकतो. (WI vs AUS 3rd T20I: जुन्या रंगात परतला Chris Gayle, 5 वर्षानंतर पहिले अर्धशतक ठोकत रचला इतिहास)

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या गेलची मॅचनंतरची मुलाखत त्याच्या षटकारांप्रमाणेच मनोरंजक होती. स्वत:ला ‘युनिव्हर्स बॉस’ म्हणून बोलवून घ्यायला आवडणाऱ्या गेलने अर्धशतक झळकावल्यानंतर आपली बॅट उंचावली. जगभरातील क्रिकेट चाहत्यांसाठी गेलचा हावभाव काही नवीन नाही परंतु यावेळी त्याच्या बॅटच्या मागील बाजूस फक्त बॉस लिहिलेले दिसून आले. एका मुलाखतीत यासंदर्भात विचारले असता गेल म्हणाला की, आयसीसी त्याच्या बॅटच्या मागे ‘युनिव्हर्स बॉस’ वापरू इच्छित नाही. “फक्त बॉस आहे…आपणास माहित आहे की हे युनिव्हर्स बॉस आहे परंतु आयसीसी मला वापरू देत नाही म्हणून मी युनिव्हर्स बॉस छोटे केले म्हणजे ते फक्त ‘द बॉस’ ठेवले. मी बॉस आहे,” गेल म्हणाला.

तसेच ‘युनिव्हर्स बॉस’ वर आयसीसीचा कॉपीराइट आहे का, असे जेव्हा त्याला विचारले गेले तेव्हा त्याने आणखी एक मजेदार उत्तर दिले. “हा हा. ठीक आहे, मला त्याचा कॉपीराइट करावा लागेल,” गेल म्हणाला. त्यानंतर पत्रकार म्हणाला की, “आयसीसी क्रिकेटचा प्रमुख आहे, बरोबर?” यावर गेलने उत्तर दिले: "नाही नाही, मी आहे, आयसीसी नाही. मी तांत्रिकदृष्ट्या बॉस आहे.” दरम्यान 41 वर्षीय गेलने 2016 नंतर पहिले आंतरराष्ट्रीय टी-20 अर्धशतक करत सात षटकार आणि चार चौकार खेचले. यादरम्यान गेल टी-20 क्रिकेटमध्ये 14,000 धावांचा पल्ला सर करणारा पहिला खेळाडू ठरला.