विराट कोहली (Virat Kohli) आणि सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) हे भारतीय क्रिकेटमधील (Indian Cricket) दिग्गज खेळाडू आहेत. कोहली तेंडुलकरला आयडल मानून मोठा झाला आणि जेव्हा मास्टर ब्लास्टरने क्रिकेटमधून निवृत्ती घेतला तेव्हा तो भारतीय क्रिकेट संघाचा भाग होता. ज्या माणसाने संपूर्ण देशाला क्रिकेटचे मोठे पॉवरहाऊस बनण्याचे स्वप्न पाहण्यास शिकवले हे लक्षात घेऊन कोहलीने तेंडुलकरला तोपर्यंत आपल्याकडे असलेली बहुमूल्य भेट दिली. ही संपत्ती म्हणजे विराटचे दिवंगत वडील प्रेम कोहली (Prem Kohli) त्यांनी त्याला दिलेला ‘पवित्र धागा’ होता. सचिनला त्याच्यासाठी आणि संपूर्ण देशासाठी काय हे दाखवण्यासाठी त्याने निवृत्तीच्या निमित्ताने तो धागा ‘क्रिकेटच्या देवाला’ देण्याचा निर्णय घेतला. तेंडुलकरने काही काळ हा धागा आपल्याजवळ ठेवला, पण त्याने तो परत केला. ग्रॅहम बेन्सिंगरसोबतच्या चॅटमध्ये तेंडुलकरने याबाबत किस्सा शेअर केला आणि तो परत करण्याचा निर्णय का घेतला हे उघड केले.
याबद्दल बोलताना तेंडुलकरने आता म्हटले की, तो त्याच्यासाठी खूप भावनिक क्षण होता आणि विराटने दिलेली ही भेट त्याच्या हृदयाला स्पर्शून गेली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून आपल्या अंतिम सामन्याचा प्रसंगाची आठवण काठून तेंडुलकर म्हणाला, “मी एका कोपऱ्यात एकटाच डोक्यावर टॉवेल घेऊन बसलो होतो आणि अश्रू पुसत होतो व मी खरोखरच भावूक झालो होतो. आणि त्यावेळी विराट माझ्याकडे आला होता आणि विराटने त्याच्या वडिलांनी दिलेला पवित्र धागा मला दिला...“आणि मी ते काही काळ जपून ठेवले आणि नंतर ते त्याला परत केले. मी म्हणालो, ‘हे अनमोल आहे आणि याला तुमच्याकडेच राहायचे हवे आणि इतर कोणाकडे नाही. ही तुमची मालमत्ता आहे. आणि ते तुझ्या शेवटच्या श्वासापर्यंत राहायला हवं.’ आणि मी ते त्याला परत दिलं. त्यामुळे तो एक भावनिक क्षण होता, जो माझ्या स्मरणात कायमचा राहील.”
सचिनने 2013 मध्ये वानखेडे स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटचा क्रिकेट सामना खेळताना आपल्या कारकिर्दीला ब्रेक लावला. सचिनने 24 वर्षे भारतासाठी 200 कसोटी सामने आणि 463 वनडे सामने खेळले. त्याने शेवटची कसोटी 16 नोव्हेंबर 2013 रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्ध होती, जी त्याच्या कारकिर्दीतील 200 वी कसोटी मॅच होती.