Virat Kohli (Photo Credit - Twitter)

Royal Challengers Bangalore: जेतेपदासाठी 17 वर्षांपासून आसुसलेला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघ रजत पाटीदार (Rajat Patidar) च्या नेतृत्वाखाली आयपीएलच्या या हंगामात प्रवेश करेल. गेल्या वर्षी झालेल्या मेगा लिलावात संघाने फाफ डु प्लेसिसला संघात स्थान दिले नाही. त्याने तीन वर्षे संघाचे नेतृत्व केले होते. यानंतर, संघाने अनुभवी खेळाडू विराट कोहलीलाही कर्णधारपदासाठी विचारणा केली, परंतु त्यानेही नकार दिला. आरसीबीचा यष्टीरक्षक-फलंदाज जितेश शर्माने आता खुलासा केला आहे की संघाने विराटऐवजी पाटीदारला कर्णधार का बनवले.

जितेशने एका पॉडकास्टमध्ये या विषयावर भाष्य केले. तो म्हणाला, 'सर्वांना कळल्यानंतर मला रजत पाटीदार कर्णधार झाल्याचे कळले. पण जेव्हा तुम्ही काही काळ खेळाशी जोडले जाता तेव्हा तुम्हाला गोष्टी समजतात. विराटला नेतृत्वाची जबाबदारी नको हवी होती.

रजत पाटीदारला पाठींबा

तो पुढे म्हणाला, 'मला माहित नाही की त्याला कर्णधारपद का नको होते. मी व्यवस्थापनात सहभागी नाही. विराट गेल्या दोन-तीन वर्षांपासून कर्णधारपद भूषवत नव्हता. त्यामुळे मला वाटले की तो या वर्षीही कर्णधारपद भूषवणार नाही. त्यामुळे, माझ्या मते, रजत हा कर्णधारपदासाठी सर्वोत्तम पर्याय होता. रजत नक्कीच कर्णधार झाला पाहिजे. तो अनेक वर्षांपासून आरसीबीसोबत आहे.