
Royal Challengers Bengaluru vs Delhi Capitals, TATA IPL 2025 24th Match: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 24 वा सामना गुरुवारी म्हणजेच 10 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (RCB vs DC) यांच्यात बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर (M.Chinnaswamy Stadium, Bengaluru) संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाईल. या हंगामात, आरसीबीचे नेतृत्व रजत पाटीदार करत आहे. तर, दिल्ली कॅपिटल्सची कमान अक्षर पटेलच्या खांद्यावर आहे. या हंगामात दिल्ली कॅपिटल्सची कामगिरी अद्भुत राहिली आहे. दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत आणि सर्व जिंकले आहेत. त्याच वेळी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आतापर्यंत चार सामने खेळले असुन 3 सामने जिंकले आहेत आणि 1 मध्ये पराभव पत्करला आहे.
हेड टू हेड रेकॉर्ड (DC vs RCB Head to Head Record)
आयपीएलच्या इतिहासात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात एकूण 31 सामने खेळले गेले आहेत. या काळात, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वरचढ ठरले आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने 19 सामने जिंकले आहेत. तर, दिल्ली कॅपिटल्सने फक्त 11 सामने जिंकले आहेत. एका सामन्याचा निकाल लागला नाही. या हंगामात दोन्ही संघांमधील ही पहिलीच भेट आहे. आयपीएलच्या गेल्या हंगामात दोन्ही संघांमध्ये एक सामना खेळवण्यात आला होता. या काळात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने विजय मिळवला होता.
बंगळुरूची खेळपट्टी फलंदाजीसाठी स्वर्ग मानली जाते
आरसीबी आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्यात एम. चिन्नास्वामी स्टेडियमच्या खेळपट्टीबद्दल बोलायचे झाले तर, या हंगामात आतापर्यंत येथे एक सामना खेळला गेला आहे, ज्यामध्ये आरसीबी संघ प्रथम फलंदाजी करताना केवळ 169 धावा करू शकला होता, परंतु त्या सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या गुजरात टायटन्सने 2 षटकांनी आधीच सामना जिंकला. चिन्नास्वामीची खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली मानली जाते, जिथे संघ 200 पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य सहजपणे गाठू शकतात.
When Delhi’s own Virat Kohli locks horns with the Delhi Capitals, and Bengaluru’s KL Rahul stares down RCB—you know it’s more than just runs.
It’s personal. It’s pride. It’s Rivalry Week! 🔥 #IPLRivalryWeek#IPLonJioStar 👉 #RCBvDC | THU, 10 Apr | 6:30 PM LIVE on Star Sports 1,… pic.twitter.com/55yXOqP1MN
— Star Sports (@StarSportsIndia) April 10, 2025
आतापर्यंत या मैदानावर एकूण 96 आयपीएल सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 41 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे तर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने 51 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. येथे पहिल्या डावाची सरासरी धावसंख्या 165 ते 170 धावांच्या दरम्यान दिसून आली आहे.
सामन्यादरम्यान कसे असले बंगळुरूमधील हवामान
या सामन्यादरम्यानच्या हवामानाबद्दल बोलायचे झाले तर, चाहते 10 एप्रिल रोजी बंगळुरूमध्ये संपूर्ण सामना एन्जॉय करू शकतात. AccuWeather च्या अहवालानुसार, पावसाची शक्यता नसली तरी, सामन्यादरम्यान तापमान 27 ते 31 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची अपेक्षा आहे, त्यामुळे खेळाडूंना तीव्र उष्णतेचा सामना करावा लागणार नाही.