MI vs SRH (Photo Credit - X)

Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad, 33rd Match: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 33 वा सामना आज म्हणजेच 17 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाईल. या हंगामात, मुंबई इंडियन्सचे नेतृत्व हार्दिक पांड्या करत आहे. तर, सनरायझर्स हैदराबादची कमान पॅट कमिन्सच्या खांद्यावर आहे. आतापर्यंत मुंबईने सहा सामने खेळून दोन सामने जिंकले आहेत. तर, हैदराबादची आकडेवारी देखील मुंबईसारखीच आहे. त्यांनीही फक्त दोन सामने जिंकले आहेत. त्यामुळे पाॅइंट टेबलमध्ये पुढे जाण्यासाठी दोन्ही संघामध्ये रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो.

हेड टू हेड रेकाॅर्ड (MI vs SRH Head to Head Record)

आयपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात एकूण 23 सामने खेळले गेले आहेत. या काळात, मुंबई इंडियन्सने वरचढ कामगिरी केली आहे. मुंबई इंडियन्स संघाने 13 सामने जिंकले आहेत. तर, सनरायझर्स हैदराबादने फक्त 10 सामने जिंकले आहेत. या हंगामात दोन्ही संघांमधील ही पहिलीच भेट आहे. आयपीएलच्या गेल्या हंगामात दोन्ही संघांमध्ये दोन सामने खेळले गेले होते. या काळात दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला.

गुगलनुसार मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स सामना जिंकण्याची शक्यता (MI vs SRH Google Win Probability)

या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाचा वरचष्मा असल्याचे दिसून येत आहे. हा सामना सनरायझर्स हैदराबादसाठी आव्हानात्मक असू शकतो, विशेषतः मुंबई इंडियन्सच्या मजबूत गोलंदाजी आणि फलंदाजीविरुद्ध. मुंबई इंडियन्सच्या अलीकडील कामगिरीकडे पाहता, ते स्पर्धेतील ३२ वा सामना जिंकू शकतात. दोन्ही संघांमध्ये एक रोमांचक सामना पाहायला मिळतो.

मुंबई इंडियन्स जिंकण्याची शक्यता: 57%

सनरायझर्स हैदराबादची जिंकण्याची शक्यता: 43%

दोन्ही संघांच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनवर एक नजर

मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, मिशेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट आणि अश्विनी कुमार.

सनरायझर्स हैदराबादः ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, कामिंडू मेंडिस, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अनिकेत वर्मा, पॅट कमिन्स (कर्णधार), झीशान अन्सारी, जयदेव उनाडकट आणि मोहम्मद शमी.