Arun Jaitley Stadium, Delhi (Photo Credit - X)

DC vs RCB, TATA IPL 2025 46th Match: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 46 वा सामना आज म्हणजेच 27 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (DC vs RCB) यांच्यात दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाईल. या हंगामात, आरसीबीचे नेतृत्व रजत पाटीदार करत आहे. तर, दिल्ली कॅपिटल्सची कमान अक्षर पटेलच्या खांद्यावर आहे. या हंगामात दोन्ही संघांची कामगिरी आतापर्यंत उत्कृष्ट राहिली आहे. त्यामुळे आजचा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा असणर आहे. (हे देखील वाचा: DC vs RCB, TATA IPL 2025 46th Match Key Players: आज दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार चुरशीचा सामना, सर्वांच्या नजरा असतील 'या' दिग्गज खेळाडूंवर)

हेड टू हेड रेकॉर्ड (DC vs RCB IPL 2025 Head to Head)

आयपीएलच्या इतिहासात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात एकूण 32 सामने खेळले गेले आहेत. या काळात, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने वरचढ ठरले आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने 19 सामने जिंकले आहेत. तर, दिल्ली कॅपिटल्सने फक्त 12 सामने जिंकले आहेत. एका सामन्याचा निकाल लागला नाही. या हंगामात दोन्ही संघांमधील ही दुसरी भेट आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाने पहिला सामना जिंकला होता.

अरुण जेटली स्टेडियमचा खेळपट्टी अहवाल 

अरुण जेटली क्रिकेट स्टेडियम हे फलंदाजांसाठी स्वर्ग मानले जाते. या मैदानावर जलद आउटफिल्ड आणि लहान सीमारेषेमुळे फलंदाजांना जलद धावा काढण्यास मदत मिळते. या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांसाठी फारसे काही नाही. अशा परिस्थितीत गोलंदाज विकेट घेण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न करतात. या मैदानावरील खेळपट्टीवरून फिरकी गोलंदाजांना मदत मिळते आणि त्यांचा रेकॉर्डही चांगला आहे. या स्टेडियमची खेळपट्टी काळ्या मातीची आहे, जी खूप कठीण आणि सपाट आहे. नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्यास प्राधान्य देईल.

दोन्ही संघांच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनवर एक नजर

दिल्ली कॅपिटल्स: अभिषेक पोरेल, करुण नायर, केएल राहुल (विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, आशुतोष शर्मा, अक्षर पटेल (कर्णधार), विप्रज निगम, मिशेल स्टार्क, कुलदीप यादव, मुकेश कुमार आणि मोहित शर्मा.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: विराट कोहली, फिल सॉल्ट, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), रोमॅरियो शेफर्ड, जितेश शर्मा (विकेटकीपर), टीम डेव्हिड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवूड आणि यश दयाल.