
DC vs KKR TATA IPL 2025 48th Match: टाटा आयपीएल 2025 (IPL 2025) चा 48 वा सामना आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (DC vs KKR) यांच्यात दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाणार आहे. दिल्लीने आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. त्यांनी 9 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्यांनी 6 जिंकले आहेत आणि 3 गमावले आहेत. दुसरीकडे, कोलकाता नाईट रायडर्सने आतापर्यंत 9 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये 3 विजय, 5 पराभव आणि एक सामना अनिर्णीत राहिला. त्यामुळे आजचा सामना रोमांचक होणार आहे.
कशी असणार खेळपट्टी?
दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांना अनुकूल आहे. येथे फलंदाज खूप धावा काढतात. चेंडू बॅटवर छान येतो, ज्यामुळे फलंदाजांना धावा करणे सोपे होते. लहान चौकारांमुळे, या मैदानावर बरेच चौकार आणि षटकार मारले जातात. तथापि, या खेळपट्टीवर जुना चेंडू फिरकीपटूंनाही मदत करतो. तर वेगवान गोलंदाजांना सुरुवातीच्या षटकांमध्ये थोडा स्विंग मिळतो. या मैदानावर अनेकदा उच्च धावसंख्या असलेले सामने दिसतात. आता दिल्ली आणि कोलकाता यांच्यातील सामना कसा होतो हे पाहणे बाकी आहे.
पाहा दोन्ही संघाची संभाव्य प्लेइंग 11
कोलकाता: रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), सुनील नरेन, अजिंक्य रहाणे (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, आंग्रिश रघुवंशी, रमणदीप सिंग/मनीष पांडे, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, मोईन अली, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती
दिल्ली: फाफ डू प्लेसिस, अभिषेक पोरेल, करुण नायर, केएल राहुल (विकेटकीपर), अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, विपराज निगम, मिचेल स्टार्क, दुष्मंथा चमीरा, कुलदीप यादव, मुकेश कुमार, आशुतोष शर्मा