Photo Credit- X

Who is Ayush Mhatre? भारतीय अंडर-19 संघातील युवा खेळाडू आयुष म्हात्रे (Ayush Mhatre) याला ऋतुराज गायकवाड जखमी (Rituraj Gaikwad injured) झाल्यामुळे त्याच्या जागी सीएसके संघात स्थान मिळाले आहे. ऋतुराज गायकवाड जखमी झाल्याने धोनीकडे (MS Dhoni)संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी आली आहे. उजव्या हाताचा खेळाडू आयुष म्हात्रेचा सीएसके संघात समावेश करण्यात आला आहे. आयुष म्हात्रे हा स्थानिक क्रिकेटमध्ये त्यांच्या स्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहेत.

आयुष म्हात्रे कोण आहे?

आयुष म्हात्रे याला वयाच्या 17 वर्षी उत्तम खेळीमुळे सीएसके संघात स्थान मिळाले आहे. आयुषने रणजी ट्रॉफी सामन्यात महाराष्ट्राविरुद्ध 176 धावांची मोठी खेळी केली होती. रहाणे, अय्यर आणि शिवम दुबे सारख्या अनुभवी फलंदाजांमध्ये आक्रमकता आणि संयम यांची सांगड घालून त्याने संघात स्वतःचे स्थान निर्माण केले. आयुष म्हात्रेने देशांतर्गत क्रिकेटमध्ये अनेक धावा केल्या आहेत.

आयुष म्हात्रे याने 9 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये खेळलेल्या 16 डावांमध्ये 504 धावा केल्या. त्याची सर्वोच्च धावसंख्या 176 धावा आहे. त्याने यामध्ये 2 शतके आणि 1 अर्धशतक झळकावले होते. लिस्ट ए मध्ये त्याने 7 डावात 458 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याने 2 शतके आणि 1 अर्धशतक झळकावले आहे.

सीएसके 2025 आयपीएल प्रवास

चेन्नई संघासाठी हा हंगाम आतापर्यंत खूपच निराशाजनक राहिला आहे. संघाने सहा सामने खेळले आहेत ज्यापैकी त्यांना फक्त एकच सामना जिंकता आला आहे. त्यांना सलग पाच सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान, कोपराच्या फ्रॅक्चरमुळे कर्णधार ऋतुराज गायकवाड संपूर्ण हंगामातून बाहेर पडल्याने संघाच्या अडचणी आणखी वाढल्या. आता सर्वांच्या नजरा नव्या खेळाडूवर आहेत.