IND vs BAN ODI 2022: टीम इंडियातील प्रयोग कधी थांबणार? गेल्या 4 सामन्यांमध्ये चार वेगवेगळ्या ओपनिंग जोड्या मिळाल्या पाहायला
Ishan Kishan And Virat Kohli (Photo Credit - Twitter)

IND vs BAN: तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) दुखापतीमुळे प्लेइंग 11 चा भाग नाही. अशा परिस्थितीत संघाचे कर्णधारपद केएल राहुलच्या (KL Rahul) हाती आहे. केएलने या सामन्यात इशान किशनला (Ishan Kishan) संधी दिली आणि रोहितच्या जागी इशानला प्लेइंग 11 चा भाग बनवले. टीम इंडियाने गेल्या काही काळापासून पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये अनेक सलामीवीर फलंदाजांना आजमावले आहे. कर्णधार रोहितच्या दुखापतीमुळे धवन आणि ईशानची जोडी मैदानात उतरली असली तरी, गेल्या चार वनडे सामन्यांमध्ये चार वेगवेगळ्या सलामीच्या जोडीचा प्रयत्न करण्यात आला आहे हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

4 सामन्यात 4 जोड्या

खरे तर या सामन्यासह मागील चार सामन्यांमध्ये चार वेगवेगळ्या सलामीच्या जोडींनी भारतासाठी डावाची सुरुवात केली आहे. बांगलादेश दौऱ्यापूर्वी भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळला होता, त्यादरम्यान टीम इंडियाच्या अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती, त्यानंतर शिखर धवन आणि शुभमन गिल यांनी भारतासाठी सलामी दिली होती. बांगलादेशसाठी पहिल्या सामन्यात शिखर घवन आणि रोहित शर्माने सलामी दिली. रोहितच्या दुखापतीमुळे दुसऱ्या सामन्यात शिखर घवन आणि विराट कोहलीने डावाची सुरुवात केली. त्याचवेळी तिसऱ्या सामन्यात शिखर घवन आणि ईशान किशन यांनी सलामी दिली. अशा स्थितीत टीम इंडियाने गेल्या 4 सामन्यांमध्ये चार जोड्या आजमावल्या आहेत. (हे देखील वाचा: IND vs BAN: टीम इंडियामध्ये अचानक मोठा बदल, शेवटच्या वनडेसाठी कुलदीप यादवचा संघात समावेश)

संधी मिळताच ईशान किशनने लगावले शतक

इशान किशनने 103 चेंडूत 150 धावा पूर्ण केल्या आणि वीरेंद्र सेहवागचा विक्रमही मोडला. सेहवागने इंदूर येथे वेस्ट इंडिजविरुद्ध 112 चेंडूत 150 धावा पूर्ण केल्या होत्या. किशनला या सामन्यात द्विशतक झळकावण्याची मोठी संधी आहे. जर तो हे करू शकला तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतक न करता 200 धावा करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरेल. यापूर्वी, एकदिवसीय क्रिकेटमधील त्याची सर्वात मोठी खेळी 93 धावांची होती, जी त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळली होती. इशानचा हा 10वा एकदिवसीय सामना असून त्याला नवव्यांदा फलंदाजीची संधी मिळाली.