IND vs BAN: बांगलादेशविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे भारतीय संघ त्रस्त आहे. दुसऱ्या वनडेनंतर कर्णधार रोहित शर्मा आणि दीपक चहर जखमी झाले. आणि पहिल्या वनडेनंतर कुलदीप सेनलाही दुखापत झाली होती. अशा स्थितीत तिसऱ्या वनडेआधीच मालिका गमावलेल्या भारतीय संघात मोठा बदल पाहायला मिळत आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील मालिकेतील शेवटचा वनडे सामना 10 डिसेंबर रोजी चट्टोग्राम येथे होणार आहे. यासाठी टीम इंडियाच्या संघात थोडा बदल करण्यात आला आहे.
शुक्रवारी संघात बदल करताना बीसीसीआयने शेवटच्या वनडेसाठी गोलंदाज कुलदीप यादवचा संघात समावेश केला आहे. तर दीपक चहर आणि कुलदीप सेन यांना बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये रिपोर्ट करण्यास सांगितले आहे. याशिवाय कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या एकदिवसीय सामन्यानंतरच मुंबईला रवाना झाला असून तो शेवटच्या वनडेतून बाहेर पडणार आहे. अशा परिस्थितीत केएल राहुल कर्णधारपदाची धुरा सांभाळेल आणि कुलदीप यादव आता शेवटच्या वनडेच्या प्लेइंग 11 मध्ये दिसू शकतो.
🚨 NEWS 🚨: Kuldeep Yadav added to #TeamIndia squad for the final ODI against Bangladesh. #BANvIND
Other Updates & More Details 🔽https://t.co/8gl4hcWqt7
— BCCI (@BCCI) December 9, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)