जेव्हा पाकिस्तानविरुद्ध 2012 आशिया कप दरम्यान विराट कोहली, रोहित शर्मावर भडकला एमएस धोनी, वाचा नक्की घडलं तरी काय
विराट कोहली-रोहित शर्मा (Photo Credit: Getty)

विराट कोहलीने (Virat Kohli) त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील बर्‍याच गोष्टींचा आर अश्विनबरोबर इन्स्टाग्रामवर थेट चॅट दरम्यान याचा उल्लेख केला. या संभाषणादरम्यान त्यांनी 2012 मध्ये भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) टीममधील आशिया चषक दरम्यान खेळल्या गेलेल्या सामन्याचा उल्लेखही केला. या सामन्यादरम्यान विराट आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्यात मैदानावर जबरदस्त टक्कर झाली होती. अश्विनशी बोलताना कोहलीने घटनेची आठवण करत सांगितले की त्यावेळी भारताचे क्षेत्ररक्षण चालू होते. रोहित डिप स्क्वेअर लेगमध्ये मैदानात उतरत असताना मी डीप मिड-विकेटवर उभा होतो. ज्यावेळी दोघेही मैदानावर आदळले तेव्हा अश्विन गोलंदाजी करीत होता. या दरम्यान फलंदाजाने एक शॉट मारला आणि मी व रोहित चेंडू पकडण्यासाठी धावला. त्या दरम्यान माझ्या डोक्याचा उजवा भाग रोहितच्या खांद्यावर आदळला. विराटने सांगितले की तो एक भयंकर टक्कर होती आणि या दरम्यान पाकिस्तानी फलंदाजांनी तीन धावा घेतल्या. (वर्ल्ड कप 2011 फायनलमध्ये टॉसवरून झाला मोठा वाद, एमएस धोनीने दुसऱ्यांदा करण्याच्या मागणीचा कुमार संगकाराने सांगितला किस्सा)

या घटनेने तत्कालीन कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) अजिबात खूश नव्हता. दोघांमध्ये कशी टक्कर होऊ शकते आणि ते तीन धावा देऊ शकतात अशी धोनीची प्रतिक्रिया होती. पाकिस्तानविरुद्ध आशिया कपच्या 2012 मधील सामन्यात विराटने वनडे कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट 183 धावा केल्या. हा सामना ढाका येथे खेळला गेला. विराट म्हणाला, “हे खूप मजेदार होते आणि मला आठवते की एमएस याबद्दल फारसा खूश नव्हता. माझ्या मते पाकिस्तानने 329 केल्या आणि त्यांच्या सुरुवातीच्या काळात काही बऱ्याच मोठ्या भागीदारी झाल्या. त्यावेळी आमचा (तो आणि रोहित) गोंधळ उडाला, तो एक असावा असे मानले जात होते पण आम्ही तीन धावा दिल्या,” अशी संघाचे सहकारी अश्विनला दिलेल्या मुलाखतीत कोहलीने आठवण सांगितली.

दरम्यान, सामन्यात रोहितने रोहितने 83 चेंडूत 68 धावांची खेळी केली आणि विराटला साथ दिली. सचिनने त्याच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात 52 धावा केल्या. 329 धावांचे आव्हान मिळूनही भारताने सहजतेने खेळ जिंकला. धोनीला मैदानावरील त्याच्या शांत स्वभावासाठी कॅप्टन कूलचा मान देण्यात आला आहे. पण आजवर आप असे अनेक प्रसंग पहिले किंवा ऐकले असतील जेव्हा धोनीने क्रिकेट सामान्या दरम्यान स्वतःवरचा ताबा गमावला.