Photo Credit- X

Australia National Cricket Team vs Pakistan National Cricket Team Live Telecast: ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान (Aus vs Pak) संघातील 3 सामन्यांच्या टी 20 मालिकेतील दुसरा सामना 16 नोव्हेंबर रोजी सिडनी क्रिकेट ग्राउंड, सिडनी येथे खेळवला जाणार आहे. पाकिस्तानने अलीकडेच एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलियाला पराभूत केले. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील दुसऱ्या टी20 सामन्यापूर्वी हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी बॅटल, स्ट्रीमिंग यासह सर्व तपशील वाचण्यासाठी बातमी वाचा. (हेही वाचा: AUS vs PAK 2nd T20 2024 Preview: ऑस्ट्रेलियाचा सामना जिंकून मालिका काबीज करण्याचा प्रयत्न; हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी बॅटल, स्ट्रीमिंगसह सर्व माहिती घ्या जाणून)

या सामन्यात यजमान संघाने प्रथम फलंदाजी केली. तर पाकिस्तानने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ग्लेन मॅक्सवेलच्या 19 चेंडूत 43 धावांच्या झटपट खेळीमुळे ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या डावात एकूण 93 धावा केल्या. पाकिस्तानबद्दल बोलायचे झाले तर, लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या टीमची टॉप ऑर्डर कोलमडली. साहिबजादा फरहान आठ धावा करून बाद झाला. तर मोहम्मद रिझवान शून्यावर बाद झाला. बाबर आझम आणि उस्मान खान यांनी अनुक्रमे तीन आणि चार धावा केल्या. तर सलमान आघानेही चार धावा जोडल्या. पाकिस्तानला दुसऱ्या डावात केवळ 64 धावा करता आल्या आणि ऑस्ट्रेलियाने हा सामना 29 धावांनी जिंकला.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान दुसरा टी 20 2024 कधी आणि कुठे खेळला जाईल?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील 3 सामन्यांच्या टी 20 मालिकेतील दुसरा सामना 16 नोव्हेंबर (शनिवार) रोजी सिडनी येथील सिडनी क्रिकेट मैदानावर भारतीय वेळेनुसार दुपारी 01:30 वाजता खेळवला जाईल. ज्याची नाणेफेक दुपारी 01:00 वाजता होईल.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान 2रा टी20 2024 चे थेट प्रक्षेपण कसे पहावे?

ऑस्ट्रेलियाच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांचे प्रसारण हक्क 2022 पासून स्टार स्पोर्ट्सकडे आहेत. त्यामुळे, भारतात ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान 2रा टी20 2024 चे थेट प्रक्षेपण पाहण्यात स्वारस्य असलेल्या चाहत्यांना ते स्टार स्पोर्ट्स नेटवर्क टीव्ही चॅनेलवर पाहता येईल. AUS vs PAK 2024 ऑनलाइन पाहण्यासाठी पर्यायांसाठी, खाली स्क्रोल करा.