वेस्ट इंडिज क्रिकेट टीम (Photo Credit: Twitter/ICC)

भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI T20) यांच्यातील टी-20 मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. एकदिवसीय मालिकेतील पराभव विसरून वेस्ट इंडिजचा (WI) संघ पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना जिंकण्याच्या इराद्याने खेळणार आहे. यादरम्यान दोन्ही संघांमध्ये एकूण पाच सामने खेळवले जाणार आहेत. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने गुरुवारी या मालिकेसाठी 16 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. यामध्ये निकोलस पूरनकडे संघाची कमान सोपवण्यात आली आहे, तर रोवमन पॉवेलला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. स्फोटक फलंदाज शिमरॉन हेटमायर आठ महिन्यांनंतर संघात परतला आहे. एकदिवसीय मालिकेत मिळालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी वेस्ट इंडीजचा संघ मैदानात उतरणार आहे.

भारताविरुद्ध वेस्ट इंडीजचा टी-20 संघ

निकोलस पूरन (कर्णधार), शामराह ब्रूक्स, ब्रेंडन किंग, कायले मायर्स, रोवमन पॉवेल (उपकर्णधार), डोमेनिक ड्रेक्स, ओडेन स्मिथ, अल्झारी जोसेफ, जेसन होल्डर, ओबेद मेकॉय, अकील होसेन, रोमारियो शेफर्ड, शिमरन हेटमायर, किमो पॉल, हेडन वॉल्श, डेवॉन थॉमस. (हे देखील वाचा: IND vs WI 1st T20: रोहित शर्मा करणार चौकार-षटकारांची बरसात! नेटवर दिसुन आला सराव करताना (Watch Video)

Tweet

वेस्ट इंडीजविरुद्ध भारताचा टी-20 संघ

रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत (विकेटकिपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, रवींद्रचंद्र अश्विन, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, अव्वल खान. हर्षल पटेल, अर्शदीप सिंग. (केएल राहुल आणि कुलदीप यादव यांची निवड त्यांच्या फिटनेसवर अवलंबून असेल.)