Sarfaraz Ahmed (Photo Credits: Twitter)

पाकिस्तान (Pakistan) क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सरफराज अहमद (Sarfaraz Ahmed) याचे सोशल मिडियावर सक्रिय असणाऱ्या सेलिब्रिटींपैकी एक आहे. सरफराजसाठी सध्या मैदानावर किंवा मैदानाबाहेर चांगला काळ नाही आहे. कर्णधार पदावरून काढून टाकल्यानंतर सध्या पाकिस्तान संघातून बाहेर असलेल्या सरफराजला त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. विश्वचषक स्पर्धेदरम्यान ट्रोलर्सनी सरफराजला ट्रोल करण्याची सर्व मर्यादा ओलांडली होती. विश्वचषक 2019 दरम्यान सरफराजला ट्रोल करणाऱ्या यूजर्सची पातळी सर्वांनी पाहिली आहे. आता त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये कराचीमध्ये जिम संपल्यानंतर सरफराज असे म्हणतांना ऐकू येतो की "आम्ही गोरे दिसत आहोत, मित्रा..." यानंतर, इंटरनेटवर मजेदार टिप्पण्या येत आहेत. यूजर्स सरफराजला ट्रोल करण्याची कोणतीही संधी सोडत नाहीत.

पाकिस्तानच्या माजी कर्णधाराला ट्रोल करण्याची संधी सोडली नसल्यामुळे सरफराजच्या या टिप्पणीवर नेटिझन्सकडून निंदनीय प्रतिक्रिया व्यक्त केल्या. पाहा सरफराजचा हा व्हिडिओ:

नेटकऱ्यांनी अश्याप्रकारे व्यक्त केला संताप:

सरफराजचा निकृष्ट दर्जा

शून्य कामगिरी

मिम्स बनण्यासाठी झालाय जन्म

दरम्यान, पाकिस्तानचा माजी कर्णधार सरफराज सोशल मीडियावर ट्रोलिंगचा निशाणा बनण्याची ही पहिली वेळ नाही. विश्वचषकमध्ये संघाच्या खराब कामगिरीमुळे सरफराजला बर्याच टीकेचा सामना करावा लागला होता. गतवर्षी ऑक्टोबरमध्ये कसोटी आणि टी -20 संघांमधून विकेटकीपर-फलंदाज सरफराजला कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आले होते. गेल्या वर्षी टी-20 मध्ये पाकिस्तानच्या खराब कामगिरीनंतर सरफराजला कर्णधारपदावरून काढून टाकले गेले होते. मात्र, त्यावेळी टी-20 क्रमवारीत पाकिस्तान पहिल्या क्रमांकावर होता. मात्र, बांग्लादेशविरुद्ध आगामी घरच्या मैदानवरो मालिकेसाठी सरफराजचा विचार केला जाऊ शकेल असे वृत्त समोर येत आहे. या दौर्‍याबाबत अद्याप बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने कोणतीही पुष्टी केली नसली तरीही पुढील महिन्यात तीन टी-20 आणि दोन कसोटी सामन्यांसाठी बांग्लादेशचे यजमानपद भूषवण्याचा पीसीबीचा विश्वास आहे. या दौर्‍यावरील अंतिम निर्णय बीसीबी 12 जानेवारी रोजी घेईल.