
IND vs ENG Test Series 2024: भारतीय संघाला इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका (IND vs ENG Test Series 2024) खेळायची आहे. यासाठी टीम इंडियाची कमान रोहित शर्माच्या (Rohit Sharma) हातात आहे. इंग्लंड संघाचा कर्णधार बेन स्टोक्स आहे. पण कसोटी मालिकेपूर्वीच भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) आपले नाव मागे घेत वैयक्तिक कारणांमुळे पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. आता त्याच्या जागी एका युवा फलंदाजाला भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. या खेळाडूला प्रथमच कसोटी संघात संधी मिळाली आहे. (हे देखील वाचा: BCCI Awards 2024: बीसीसीआयने टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना कर्नल सीके नायडू जीवनगौरव पुरस्काराने केले सन्मानित)
या खेळाडूला मिळाली संधी
क्रिकबझच्या वृत्तानुसार, इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी विराट कोहलीच्या जागी रजत पाटीदारला संधी मिळाली आहे. मध्य प्रदेशचा फलंदाज, गेल्या काही काळापासून उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे आणि त्याने चांगली कामगिरी केली आहे. त्याने गेल्या आठवड्यात अहमदाबादमध्ये इंग्लंड लायन्सविरुद्ध 151 धावा केल्या होत्या. लायन्सविरुद्धच्या सराव सामन्यातही त्याने 111 धावा केल्या होत्या आणि गेल्या वर्षीच्या अखेरीस तो अ संघासोबत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर होता. जेव्हा जेव्हा पाटीदारला संधी मिळाली. त्या संधीचे त्याने सोने केले आहे.
आफ्रिकेसाठी वनडे पदार्पण केले
रजत पाटीदार इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत मधल्या फळीत उतरू शकतो. डिसेंबरमध्ये पार्ल येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सामन्यात त्याने पदार्पण केले. जिथे त्याने डावाची सुरुवात केली. पाटीदारची निवड म्हणजे भारत सध्या चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेवर लक्ष केंद्रित करत नाही आणि मुंबईचा फलंदाज सर्फराज खानची प्रतीक्षा थोडी लांबली आहे. यापूर्वी, इंग्लंड लायन्सविरुद्धच्या दुसऱ्या बहु-दिवसीय सामन्यासाठी रिंकू सिंगचा भारत अ संघात समावेश करण्यात आला होता.
प्रथम श्रेणीत इतक्या धावा केल्या
रजत पाटीदारने भारतीय संघासाठी 1 एकदिवसीय सामना खेळला आहे, ज्यामध्ये त्याने 22 धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने 55 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 4000 धावा केल्या आहेत. त्याने 58 लिस्ट वन सामन्यात 1985 धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 12 शतके आहेत.
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आवेश खान, रजत पाटीदार